
Raksha Bandhan Tragedy : मानसी पूल येथील खाडीच्या पाण्यात तरंगताना आढळलेला तो मृतदेह कॅम्प भटवाडी येथील विश्राम अरविंद सावंत (वय ३७) यांचा असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. मृत सावंत यांची बहीण गौरांगी सावंत हिने ओळख पटविली. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीवर भावाचा मृतदेह ओळखण्याची वेळ आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.