esakal | देवरुख नगरपंचायतीत कोरोनाचा शिरकाव
sakal

बोलून बातमी शोधा

six corona positive employees found in rajapur nagar panchayat

उद्या उर्वरित ३० कर्मचाऱ्यांची टेस्ट होणार असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आ

देवरुख नगरपंचायतीत कोरोनाचा शिरकाव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

साडवली : देवरुख  नगरपंचायतीमधील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनानुसार आज ४३ कर्मचाऱ्यांची टेस्ट करण्यात आली. त्यात तब्बल ६ कर्मचारी पॉझिटिव्ह सापडल्याने खळबळ उडाली आहे. उद्या उर्वरित ३० कर्मचाऱ्यांची टेस्ट होणार असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा - आम्ही नाटकं सादर केली, पण आमच्या पैशाचं काय ? 

आज सापडलेल्या ६ जणात कांगणेवाडीतील - ३ , माणिकचौक - १ , पर्शरामवाडी - १ आणि कुंभारवाडी - १ अशा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अजुन ३० कर्मचार्‍यांची तपासणी बुधवारी होणार आहे. गणेशोत्सवात देवरुख बाजारपेठ लॉकडाउन करण्यात आली होती. आठवडाभर दुकाने बंद होती तरीही देवरुख परीसरात कोरोना चेन ब्रेत झालेली नाही. 

हेही वाचा - तुमचं जनावर चोरीला गेले आहे ? आता ते परत मिळु शकतं ; कसे ते वाचा

शासकीय कार्यालये, पोलीस स्टेशन, नगरपंचायत आदी ठिकाणी कोरोनाने शिरकाव केला आहे. देवरुख पंचक्रोशीत आता पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत असल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. आरोग्य यंत्रणा कंबर कसुन कामाला लागली आहे. नागरीकांनी आपली काळजी आपण घेणे जरुरीचे बनले आहे.

संपादन - स्नेहल कदम 

loading image