Old Houses Sindhudurg
Old Houses Sindhudurgesakal

स्लॅबच्या बंगल्यांमुळं शाकारणी व्यवसाय धोक्यात; कोकणातील कौलारू घरं झाली दुर्मिळ, पर्यायी रोजगार शोधण्याची वेळ

शहराप्रमाणेच आता ग्रामीण भागात स्लॅबचे बंगले (Slab Bungalow) वाढत आहेत.
Summary

अलीकडच्या काळात वेगवेगळ्या डिझाईनच्या पत्र्यांमुळे आणि स्लॅबच्या घरांकडे लोकांचा कल असल्याने जुनी कौलारू घरे आता दुर्मिळ झाली आहेत.

म्हापण : अलीकडच्या काळात झपाट्याने वाढलेली स्लॅबची घरे आणि छपरासाठी पत्रे, प्लास्टिकचे आलेले पर्याय यामुळे जिल्ह्यात कौलारू घरे दुर्मिळ झाली आहेत. त्यामुळे घरांच्या शाकारणी व्यवसायात असलेल्यांचा रोजगार धोक्यात आला आहे. त्यांच्यासमोर दुसरे काम शोधण्याची वेळ आली आहे.

शहराप्रमाणेच आता ग्रामीण भागात स्लॅबचे बंगले (Slab Bungalow) वाढत आहेत. स्लॅब न परवडणारे लोक कौलारू छपरांची घरे बांधत आहेत. या घरांच्या बांधणीत प्लास्टिक, लोखंड आणि सिमेंटच्या पत्र्यांचा छप्पर म्हणून वापर केला जातो. याचा परिणाम म्हणून घरात सर्व ऋतूंत थंडावा देणारी मातीच्या नळ्यांची छप्परे दुर्मिळ झाली आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी (Rain) होणारी घरे शाकारणीची कामेही थंडावली आहेत.

Old Houses Sindhudurg
जिद्द असावी तर अशी! रत्नागिरीच्या 12 ट्रेकर्सनी तब्बल साडेबारा हजार फूट उंचीवरील 'केदारकंठ' शिखर केलं सर

खेड्यांमध्ये पूर्वीच्या काळी मातीची कौलारू घरे बांधली जात असत. या कौलारू घरांत उन्हाळ्याच्या दिवसांतही थंडावा कायम असायचा; परंतु छप्पर लावणीच्या विशिष्ट रचनेमुळे पावसाळ्यापूर्वी न चुकता या घरांची शाकारणी करावी लागत असे, अन्यथा पावसाच्या पाण्याने छपराच्या लाकडी रिपा कुजण्याची शक्यता होती. त्यामुळे पावसाळ्याआधी संपूर्ण नळे खाली उतरून खराब लाकूड सामान बदलून आणि घराची साफसफाई करून कौलै पुन्हा लावण्यात येत असत.

अजूनही ग्रामीण भागात तुरळक प्रमाणात जुन्या घरांवर कौलै बसविलेली पाहायला मिळतात. दरवर्षी ठराविक हंगामात कराव्या लागणाऱ्या घर शाकारणीच्या कामामुळे ही कला अवगत असलेल्या ग्रामस्थांसाठी हा एक रोजगारही झाला होता. त्यामुळे गावागावांत घर शाकारणी करणारे काही गट तयार झाले होते.

Old Houses Sindhudurg
'ठराव करताना आम्हाला विश्‍वासातच घेतलं नाही'; डाॅ. आंबेडकर कमान पाडल्याप्रकरणी सात सदस्यांचा मोठा दावा

या गटात चार ते पाच कामगारांचा समावेश असायचा. गावातील प्रत्येक वाडीत किमान एक तरी असा गट असायचा. गटाच्या म्होरक्याला माहिती दिल्यानंतर सूर्योदयानंतर लागलीच नळे परतणीच्या कामाला सुरुवात होत असे. सायंकाळपर्यंत हे काम चालत असे किंवा घर मोठे असल्यास दोन दिवसही लागत असत. या कामगारांचे दरही इतर कामगारांच्या मजुरीपेक्षा जास्त असत. साधारणतः एप्रिल ते मे अखेरपर्यंत चालणाऱ्या या कामामुळे गावातील अनेक कामगारांच्या गटांना रोजगार प्राप्त होत असे.

स्लॅबच्या घरांकडे लोकांचा कल

अलीकडच्या काळात वेगवेगळ्या डिझाईनच्या पत्र्यांमुळे आणि स्लॅबच्या घरांकडे लोकांचा कल असल्याने जुनी कौलारू घरे आता दुर्मिळ झाली आहेत. नळ्यांना पर्याय म्हणून व दिसायलाही आकर्षक असल्याने प्लास्टिक, लोखंडी पत्र्यांच्या वापराला अधिक पसंती मिळत आहे. त्यामुळे सिमेंट व प्लास्टिक पत्र्यांच्या आणि स्लॅबच्या अतिक्रमणामुळे घर शाकारणीची कामे आता जवळजवळ बंद झाली आहेत. त्यामुळे हंगामी का असेना, तीन-चार महिन्यांसाठी येथील कामगारांना रोजगार मिळवून देणारा हा व्यवसाय आता बंद पडत चालला आहे.

Old Houses Sindhudurg
Vinayak Raut : उद्धव ठाकरेंना लाथाडणाऱ्या गद्दारांचा विधानसभा निवडणुकीत शेवट करणार; खासदार राऊतांचा घणाघात

दृष्टिक्षेपात

  • * ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय

  • * सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय

  • * गावागावांत घर शाकारणी करणाऱ्या कामगारांचे गट

  • * आठ ते दहा कामगारांच्या समुहाला रोजगार

  • * स्लॅबच्या घरांमुळे कौलारू घरांचे प्रमाण घटतेय

  • * काँक्रिटीकरणामुळे पारंपरिक रोजगार संपुष्टात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com