मुंडेचा आदेश आणि त्या वादग्रस्त गृहपालाची अखेर बदली.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The hostel was eventually replaced by the landlord Kokan marathi news

सावंतवाडीत पालक संतप्त; मुलींना योग्य वागणूक मिळत नसल्याने उपोषण, राष्ट्रवादीचा पाठिंबा.... 

मुंडेचा आदेश आणि त्या वादग्रस्त गृहपालाची अखेर बदली....

सावंतवाडी (सिंघुदूर्ग ) : येथील शासनाच्या समाजकल्याण वसतीगृहांमध्ये मुलींना योग्य वर्तवणूक मिळत नसून यापुढे त्यांना चुकीची वागणूक मिळाल्यास गप्प बसणार नाही. अशा प्रकारची वागणूक देणाऱ्या वसतिगृहाच्या प्रभारी गृहपालाची तत्काळ जिल्ह्याबाहेर बदली केली जावी, या मागणीसाठी आंबोली येथील अर्चना चव्हाण व अरुण चव्हाण यांनी येथील समाजकल्याण वसतीगृहासमोर उपोषण छेडले.

ही बाब राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कानावर घालताच संबंधित गृहपालांच्या बदलीचे आदेश निघाले. येथील मुलींच्या वसतिगृहात राहत असलेल्या मुलींना प्रभारी गृहपाल यांच्याकडून सातत्याने चुकीची वागणूक दिली जाते. त्यामुळे त्यांची तातडीने बदली केली जावी या मागणीसाठी मुलीचे पालक अरुण चव्हाण, सौ. अर्चना चव्हाण यांनी काल (ता.14) येथील मुलीच्या वस्तीगृहासमोरच जाहीर उपोषण पुकारले. यावेळी ही बाब त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस मागासवर्गीय सेल जिल्हाध्यक्ष विजय कदम यांच्या निदर्शनास आणून दिली. असता त्यांनी ही या उपोषणाला राष्ट्रवादी पक्षातर्फे पाठींबा देत उपोषणात सहभाग घेतला.

हेही वाचा- चिपळूणच्या वेदवती केतकर संगीत नाट्य रंगभूमीवर

आपल्या वर्तवणुकीत सुधारणा करा

यावेळी उपोषण स्थळी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा सौ. रेवती राणे, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश गवस, उदय भोसले, प्रा. सतीश बागवे, माजी नगरसेवक गोविंद वाडकर, गुरुदत्त कामत, सत्यजित धारणकर, संदीप राणे, सत्यजित धारणकर,महिला जिल्हाध्यक्षा अँड. रेवती राणे, संदिप राणे, रंजना निर्मेले आदींनी या उपोषणस्थळी धाव घेतली. यावेळी पालक चव्हाण यांची कैफियत ऐकून घेत या ठिकाणी वसतिगृहाचे वरिष्ठ निरीक्षक यांना पाचारण करण्यात आले. ते दाखल होताच वसतिगृहाच्या कारभरावरून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची चांगलीच कान उघडणी केली. त्यावर माजी जिल्हाध्यक्ष सुरेश गवस यांनी या कारणाला धरून वरिष्ठ निरीक्षक यांना चांगलेच फैलावर घेतले. सर्व समस्या सुटणाऱ्या असून त्यांचा तातडीने निपटारा केला जावा, प्रभारी गृहपाल यांनी आपल्या वर्तवणुकीत सुधारणा करावी अन्यथा गप्प बसणार नाही, अशी सूचना दिली. 

हेही वाचा- राज्य नाट्य स्पर्धेत खल्वायनच्या संगीत ताजमहालची बाजी

काही तासातच बदलीचे आदेश 
जोपर्यंत संबंधित गृहपालांवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार, असा इशारा पालक चव्हाण यांनी दिला. योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन वरिष्ठ निरीक्षक यांनी दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. एकूणच या परिस्थितीबाबत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री मुंडे यांचे लक्ष वेधले. मंत्री मुंडे यांनी या प्रकरणी लक्ष घालण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर काही तासातच लिपिक चव्हाण यांच्या बदलीचे आदेश निघाले.  

Web Title: Social Welfare Government Hostel Was Eventually Replaced Landlord Kokan Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..