
Sonali Gawde Death Case : इन्सुली-कोठावळेबांध येथील सोनाली प्रभाकर गावडे (वय २५) मृत्यूप्रकरणी वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी तिचा मृतदेह आढळून आला त्या ठिकाणावर बांदा पोलिसांना तपासा दरम्यान तिचा मोबाईल व दोन छत्र्या आढळून आल्या आहेत. त्यातील एक तिची तर दुसरी छत्री कोणाची? हा प्रश्न निर्माण झाला आहे.