

Vehicles face difficulties after the road beneath Sonavi Bridge was closed without prior notice.
esakal
संगमेश्वर: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सोनवी पुलाखालील रस्ता ऐन दिवाळी हंगामात अचानक वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली. रस्ता बंद केल्याबाबत कोणताही सूचनाफलक लावण्यात आलेला नाही किंवा वाहनचालकांना पूर्वसूचनाही देण्यात आलेली नाही. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना पुढे जाता येत नसल्याने माघारी फिरावे लागत आहे. काही वाहनचालकांना पर्यायी मार्गच सापडत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे.