esakal | रत्नागिरी, कळंबोलीत विशेष रुग्णालय 

बोलून बातमी शोधा

Special Hospital In Ratnagiri, Kalmboli Rajesh Tope Information

कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील 30 शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषित केली आहेत. त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय व कळंबोळी उपजिल्हा रुग्णालयांचा समावेश आहे.

रत्नागिरी, कळंबोलीत विशेष रुग्णालय 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील 30 शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषित केली आहेत. त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय व कळंबोळी उपजिल्हा रुग्णालयांचा समावेश आहे. यात 100 खाटांची सोय केली आहे. या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. त्यासाठी अधिसूचना काढण्यात आली आहे. राज्यात एकूण 2 हजार 305 खाटा कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. 

या अधिसूचनेमुळे या रुग्णालयांना संशयित आणि कोरोना निदान झालेल्या रुग्णांना केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करणे बंधनकारक असणार आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील 30 शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषित केली आहेत. या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. त्यासाठी अधिसूचना काढण्यात आली असून 2305 खाटा कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. 

राज्य शासनामार्फत कोरोना प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. राज्यात चाचण्यांची सुविधा वाढवितानाच आवश्‍यकता भासल्यास रुग्णांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष केले आहेत; मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये घोषित करण्यात आली. सिंधुदुर्ग - नवीन इमारत 75, रत्नागिरी - सामान्य रुग्णालय व कळंबोळी उपजिल्हा रुग्णालय अनुक्रमे 100 व 50 खाटांची सोय केली आहे.