त्या सहा महिन्यांच्या बाळाची अशी घेतली जाणार काळजी.....

Special squad for the treatment of a six month  baby kokan marathi news
Special squad for the treatment of a six month baby kokan marathi news
Updated on: 

रत्नागिरी :  तालुक्यातील साखरतर येथील सहा महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी (ता. 14)  पुढे आले. त्या बळावर उपचार करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दहा जणांचे स्वतंत्र पथक तयार केले असून त्यात दोन बाल रोग तज्ज्ञांची नियुक्त केली आहे. त्या बाळाच्या आईची पहिली कोरोना चाचणी निगेटीव्ह आली असली तरीही नव्याने चाचणी निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.


रत्नागिरी तालुक्यातील साखरतर येथील दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. त्यांच्या कुटुंबातील लोकांसह संपर्कात आलेल्या अशा सतरा लोकांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात विलगीकरण करुन ठेवण्यात आले होते. त्यामध्ये सहा महिन्याच्या बाळाचाही समावेश होता. त्या सगळ्यांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यामध्ये सहा महिन्याच्या बाळाचे नमुने कोरोना पॉझिटीव्ह आले.

यापुर्वी साखरतरमध्ये आढळलेल्या पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा तो नातू आहे. साखरतर परिसरासह एकाच कुटुंबातील तीनजण कोरोनाबाधित झाले आहेत. या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे प्रशासनापुढील चिंता वाढली आहे. सहा महिन्यांचे बाळ पॉझिटिव्ह असल्याने जिल्हा रुग्णालयाने बाळाच्या आईलाही कोरोना प्रतिबंधक औषधे सुरु केली आहे. बाळासोबत आईला ठेवणे आवश्यक असल्यामुळे रुग्णालय प्रशासनाकडून उपायोजना केल्या जात आहेत. त्या बाळाला स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे.

त्या बाळाच्या आईची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी नव्याने कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. ज्या लोकांनी त्या बाळाला हाताळले आहे, त्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. साखरतरमध्ये कोरोनाचा संसर्ग कायम राहिल्यामुळे तेथे पुन्हा सर्वेक्षण मोहिम हाती घेण्यात आली आहे. साखरतर गावात तीन रुग्ण आढळल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग कसा झाला याचे कोडे अद्यापही उलगडलेले नाही. कोरोना संसर्ग असलेली व्यक्ती या गावात येवून गेली असावी असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. स्थानिकपातळीवरुन सविस्तर माहिती दिली जात नसल्याने याचा तपास लागलेला नाही.

हेही वाचा- त्याने केला भावासह वहिनीवर कोयत्याने वार अन्....
दरम्यान, जिल्हा रुग्णालयात मंगळवारी नव्याने दोन संशयित उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील  चार जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच कामथे येथे मृत्यू झालेल्या पन्नास वर्षीय त्या रुग्णाचे नमुने निगेटीव्ह आल्यामुळे प्रशासनाने निःश्‍वास सोडला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णांची संख्या 61 असून कामथे उपजिल्हा रुग्णालयात 3, कळंबणी उपजिल्हा रुग्णालय 30, गुहागर ग्रामीण रुग्णलायात 2, मंडणगड ग्रामीण रुग्णालयात 1, संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात 2 रुग्ण उपचार घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com