
रत्नागिरी : ‘मन की बात’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आज दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात १०३ भाजप बूथ कमिट्यांमध्ये प्रक्षेपण करण्यात आले. या कार्यक्रमांना भाजप कार्यकर्त्यांसह समाजातील विविध स्तरांतील जनतेने उत्स्फूर्त सहभाग घेत प्रतिसाद दिला.
हेही वाचा: कोण आहे पद्मश्री मिळवणारा शेतकरी 'टनेल मॅन'? वाचा प्रेरणादायी संघर्ष
पंतप्रधान मोदी यांच्या मन की बात कार्यक्रम हा संपूर्ण देशात लोकप्रिय झाला आहे. १०३ भाजप बूथ, बूथप्रमुख शक्तिकेंद्र प्रमुख आणि त्या-त्या बूथमध्ये काम करणारे स्थानिक कार्यकर्ते यांनी सामूहिकरित्या एकत्र येत हा कार्यक्रम ऐकला. मोदी या कार्यक्रमातून जनतेशी थेट संवाद साधतात. आज त्यांनी अनेक उदाहरणे देत, चांगली कामे अधोरेखित केली. आपले अनुभव, अपेक्षा हेसुद्धा शेअर केले. हा कार्यक्रम प्रत्येक बूथवर ऐकला जावा, याकरिता भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी नियोजन केले. आज पहिल्या टप्प्यात १०३ बूथवर ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकला गेला. हे आयोजन तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, शहराध्यक्ष सचिन करमरकर यांनी संयोजकांच्या मदतीने केले. जिल्हा संयोजक म्हणून संदीप सुर्वे यांनी जबाबदारी सांभाळली.
हेही वाचा: "राहुल गांधी हे फेक गांधी, भाजपचं करतंय महात्मा गांधींच स्वप्न पूर्ण"
रत्नागिरी शहरात २५ बूथवर हा कार्यक्रम आयोजित केला. भाजपच्या कार्यालयात रिक्षाचालकांना एकत्र केले. त्यांच्यासह जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी मन की बात कार्यक्रम ऐकला. दुसऱ्या कार्यक्रमात शहरातील चार्टर्ड अकाउंटंट यांनी एकत्रितपणे मन की बात ऐकला. प्रभाग क्रमांक पाचमध्ये मनोहर दळी यांनी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना एकत्र करत मन की बात चाय के साथचे नेटके आयोजन केले. मिथुन निकम, संदीप सुर्वे, विकी जैन, नितीन जाधव, यशवंत वाकडे, मोहन घुमे यांच्यासह पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथप्रमुख सर्व ठिकाणी सक्रिय होते.
याचप्रमाणे लांजा, राजापूर, संगमेश्वर आणि रत्नागिरी ग्रामीण भागात मन की बातचे आयोजन केले. भाजपाचे प्रमुख पदाधिकारी विविध कार्यक्रमात सहभागी झाले. बूथ स्थरावर संघटना सक्रिय करण्याकामी ‘मन की बात’च्या आयोजनाने खूप मदत झाली. बूथ रचना सक्रिय झाली, हे मोठे यश आहे. पुढील टप्प्यात आणखी ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे असे अॅड. पटवर्धन यांनी सांगितले.
Web Title: Spontaneous Response To Mann Ki Baat Bjp Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..