'जप्त‘ वाहनधारकांची एसटी प्रशासनाकडून लूट ; दिवसाला 50 रुपये भूर्दंड'

ST administration robbery of vehicle owners
ST administration robbery of vehicle owners
Updated on

रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण फिरणार्‍या अनेक वाहनांवर कारवाई झाली.त्याना वाहन सोडविताना नाकीनऊ आले आहेत. वाहतूक पोलिस आणि आरटीओंनी केलेल्या कारवाईनंतर जप्त केलेली वाहने माळनाका येथील एसटी आगारात ठेवण्यात आली; मात्र दंड भरून वाहने सोडविण्यासाठी गेलेल्या वाहनधारकांची एसटी प्रशासन लूट करत असल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक सोहेल मुकादम यांनी केला आहे.


आगारातून वाहन सोडवताना एसटी प्रशासन दिवसाला 50 रुपये याप्रमाणे वाहन ठेवण्याचे भाडे आकारत आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत असलेला वाहनधारक एसटीच्या नियमामुळे भरडला जात आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात 22 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद करण्यात आले. मात्र अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेकजण विनाकारण वाहने घेऊन बाहेर फिरताना दिसून आल्याने जिल्हा वाहतूक शाखा आणि आरटीओ यांनी कारवाई सुरू केली.

सुरवातीला समज दिली, त्यानंतर दंडात्मक कारवाई केली, तरी वाहनधारक ऐकत नसल्याने वाहनजप्तीची कारवाई करण्यात आली. काही वाहने पोलिस परेड मैदानावर ठेवण्यात आली, तर काही वाहने माळनाका येथील एसटी आगारात ठेवण्यात आली. पोलिसांनी दंड भरून घेतल्यानंतर अनेक वाहने सोडून दिली. मात्र वाहनधारकांना एसटी प्रशासनाच्या नियमांचा मोठा भुर्दंड बसला आहे. वाहन सोडवून नेण्यासाठी येणार्‍या वाहनधारकांना जेवढे दिवस वाहन ठेवले आहे, त्याचे भूईभाडे किंवा पार्किंग चार्ज वसूल करण्यात येत आहे. वाहतूक पोलिस किंवा आरटीओंनी जप्त केलेल्या गाड्या त्यांनी सुरक्षित ठेवायच्या आहेत. त्यात वाहनधारकांचा काही संबंध नाही.

सोहेल मुकादम यांचा आरोप

एसपी ऑफिसला ठेवलेल्या गाड्या कोणतेही शुल्क न घेता दंड भरून सोडून दिले. मात्र एसटी आगारात ठेवलेल्या गाड्यांसाठी चुकीच्या पद्धतीने पार्किंग चार्ज घेतला जात आहे. टाळेबंदीमुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या वाहनधारकांचे एसटीच्या या नियमामुळे कंबरडेच मोडले आहे. याबाबत आम्ही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पालकमंत्री आणि परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब, आरटीओ विनोद चव्हाण यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी पार्किंग चार्ज न आकरण्याच्या सूचना देऊनही एसटी विभाग त्यांचा आदेश डावलून कर वसूल करीत आहे, असा आरोप नगरसेवक सोहेल मुकादम यांनी केला.

आरटीओंनी माझी दुचाकी जप्त करून 53 दिवस झाले. मी रितसर आरटीओंना सुमारे साडेसहा हजार रुपये दंड भरला तेव्हा त्यांनी माझी गाडी सोडली. परंतु एसटी आगारामध्ये आल्यानंतर त्यांनी पार्किंग चार्ज म्हणून माझ्याकडे  3 हजार 100 रुपये मागतले. ज्यांनी कारवाई केली त्यांना दंड भरला. मग यांना आम्ही का पैसे द्यायचे? जप्त वाहन सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आरटीओंची आहे. आमच्यावर हा भुर्दंड का?

- तसवर खान,दुचाकी मालक
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com