Sindhudurg ST Bus : स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर गावात प्रथमच एसटी बस; असोडे-गांगरकरवासीयांतर्फे जल्लोषी स्वागत
78 Years Connectivity in Asode Village : कोकणातील दुर्गम भागातील अनेक गावांना अजूनही मूलभूत वाहतूक सुविधा मिळालेल्या नाहीत. मात्र आता असोडे-गांगरकर या गावासाठी ऐतिहासिक क्षण ठरला. स्वातंत्र्यानंतर तब्बल ७८ वर्षांनी गावात प्रथमच MSRTC ची एसटी बस दाखल झाली.
सावंतवाडी : लांजा तालुक्यातील असोडे-गांगरकर गाव येथे स्वातंत्र्याच्या ७८ वर्षानंतर गावात प्रथमच रस्ता व एसटीची व्यवस्था झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी जल्लोष करत एसटीचे स्वागत केले.