खूशखबर ! सिंधुदुर्गातून पुणे - मुंबईला एसटी 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 August 2020

राज्य परिवहन महामंडळाने कोकणातील चाकरमान्यांसाठी विशेष एसटी बससेवा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गौरी - गणपती उत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना एसटी बससेवा सुरू असून सिंधुदुर्गातील विविध बसस्थानकातून मुंबई, पुणे निगडी या मार्गावर गाड्या सोडण्यात येणार आहेत.

कणकवली ( सिंधुदुर्ग ) - आगामी गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी बससेवा सुरू केली आहे. सिंधुदुर्गातून पुणे मुंबई या मार्गावर बसेस सोडण्यात येणार आहेत. विना ई -पास 22 प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. याचे ऑनलाईन बुकिंग सुरू आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली. 

राज्य परिवहन महामंडळाने कोकणातील चाकरमान्यांसाठी विशेष एसटी बससेवा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गौरी - गणपती उत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना एसटी बससेवा सुरू असून सिंधुदुर्गातील विविध बसस्थानकातून मुंबई, पुणे निगडी या मार्गावर गाड्या सोडण्यात येणार आहेत. याचे वेळापत्रक असे ः सावंतवाडी ते बोरीवली, पुणे-निगडी सायंकाळी 4 वाजता, मुंबईसाठी 4.30 वाजता, ठाण्यासाठी सायंकाळी 5 वाजता. दोडामार्ग ते बोरीवली सायंकाळी 6 वाजता, बांदा ते बोरवली 4.30 वाजता बस सुटेल. मालवण ते बोरीवली सायन मार्गे 4.30 वाजता, मालवण ते मुंबई 5 वाजता, विरार - बोरीवली मार्गे दुपारी 3 वाजता, मालवण ते बोरीवली सायंकाळी 5 वाजता सुटेल. 

कणकवली आगारातून बोरीवलीसाठी 4.30 वा, मुंबई सेंट्रलसाठी 4 वा, ठाणेसाठी सायंकाळी 6 वाजता, बोरीवली सायं. 5 वाजता, तळेरे ते बोरीवली पनवेल मार्गे सायंकाळी पाच वाजता सुटेल. वैभववाडी ते बोरीवली 5.30 वा, वैभववाडी ते मुंबई सायंकाळी 6, फोंडाघाट ते बोरीवली सायंकाळी पाच वाजता बस सुटेल. देवगड ते बोरीवली 5.30, जामसंडे ते बोरवली 5 वाजता, तळेबाजार 5.30 वाजता. देवगड ते कुर्ला नेहरूनगर सायंकाळी 4 वा., विजयदुर्ग ते बोरवली सायंकाळी चार तर विजयदुर्ग ते मुंबई दुपारी 3 वाजता बस आहे. कुडाळ - बोरीवली सायं 4 वाजता तर कसाल येथून 4.30 वाजता बस सुटेल. वेंगुर्ला ते बोरीवली सायंकाळी चार वाजता, शिरोडा ते बोरीवली सायंकाळी 4.30 वा. बस सुटेल. सावंतवाडी-निगडी मार्गे पुणे सायंकाळी सात वाजता बस आहे. मालवण-निगडी फोंडाघाटमार्गे सायंकाळी सहा वाजता बस तर पुणे-निगडी रात्री साडेआठ वाजता बस आहे. देवगड ते वल्लभनगर गगनबावडामार्गे रात्री आठ वाजता बस आहे, अशी माहिती रसाळ यांनी दिली.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST Service To Mumbai Pune From SIndhudurg