परब, पवार, ठाकरेंमुळे एसटी रसातळाला; किरीट सोमय्या

कामगारांचा वाढवला उत्साह, ‘हुकूमशाह तिघाडी सरकारचे तेरावे घालू’
परब, पवार, ठाकरेंमुळे एसटी रसातळाला; किरीट सोमय्या
परब, पवार, ठाकरेंमुळे एसटी रसातळाला; किरीट सोमय्याsakal media

रत्नागिरी : ‘‘परिवहनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब, शरद पवार आणि ठाकरेंनी एसटीची वाट लावली. चार तास चर्चा करत होते की पत्ते खेळत होते? कर्मचारी निलंबित केले, कर्मचारी हजर झाले, पहिली एसटी सुटली, अशा बातम्या देत होते. परब फक्त टाईमपास करत आहेत. हा संप म्हणजे क्रांती आहे. एसटी कामगारांच्या जीवाशी खेळणाऱ्या या आघाडी सरकारला सोडणार नाही. दादागिरी व वसुलीचे धंदे करणाऱ्या तिघाडी सरकारला घरी बसवू. या सरकारचे तेरावे घालू; पण अजून काही दिवस आहेत,’’ असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी येथे दिला.

परब, पवार, ठाकरेंमुळे एसटी रसातळाला; किरीट सोमय्या
केजरीवालांचा बनवाट व्हिडीओ केला शेअर; संबित पात्रांवर कारवाईचे हायकोर्टाचे आदेश

माळनाका येथे एसटी विभागीय कार्यालयाच्या बाहेर एसटी कर्मचारी काम बंद आंदोलन करत आहेत. मंगळवारी सोमय्या रत्नागिरी दौऱ्यावर आले असता, दुपारी कामगारांमध्ये सहभागी होत त्यांनी भाषण केले त्या वेळी ते बोलत होते. शासनात विलिनीकरण झालेच पाहिजे आणि कामगारांवर अन्याय करू नका, असेही सोमय्या यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘गेले पंधरा दिवस कामगार आंदोलन करत आहेत. दुसऱ्या बाजूला राज्य सरकारने दोन हजार कर्मचाऱ्यांना कमी केले, नवीन भरती केली, पहिली एसटी बस सुटली, असे खोटे सांगत आहेत. कामगारांच्या जीवाशी खेळतात त्यांना सोडणार नाही.

परब, पवार, ठाकरेंमुळे एसटी रसातळाला; किरीट सोमय्या
मुंबईत गर्भपाताच्या प्रमाणात घसरण; तीन वर्षात ३४ टक्के घट

हे वसुली सरकार

सत्तेसाठी एकत्र आलेले तिघाडी सरकार आहे. वसुलीसाठी अड्डे निर्माण केले आहेत. तिघांनी अड्डे वाटून घेतले आहे. पालकमंत्री परब कोविडच्या काळात रिसॉर्ट बांधत होते. त्यांच्या अनधिकृत बांधकामाला संरक्षण देत असाल तर..., असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. मी कोणाला घाबरत नाही तसेच एसटी कामगारपण घाबरत नाही. आम्ही रस्त्यावरच आहोत. सत्याला कोणी वाकवू शकत नाही. इथे सत्य व संघर्ष आहे, असेही किरीट सोमय्या यांनी बजावले.

मग का एसटी चालत नाही..?

ते पुढे म्हणाले, महामंडळाने कामगार युनियनशी करार केले. एवढे टक्के वाढले, म्हणून मिठाई वाटली. मग का एसटी चालत नाही. संप मिटला, कामगार कामावर आले, असे परब खोटे सांगताहेत. कामगारांना न्याय देण्याचे काम करा. मी महाराष्ट्रभर फिरतोय. मागण्या मान्य कराव्याच लागणार, असेही त्यांनी ठणकावले.

कामगार घरी जात नाही...

सोमय्या यांनी सांगितले, की आझाद मैदान, ठाणे, कल्याण, औरंगाबाद आदी सर्व ठिकाणी मी कामगारांना भेटलो. कामगार रस्त्यावर उतरले आहेत. झोपतात पण तिथेच. परवा तेरावा दिवस होता, म्हणजे आंदोलनाचा. कधीतरी या सरकारचे तेरावे करावे लागणार आहे. एसटी कामगार घरी जात नाही. साम, दाम, दंड, भेद करूनही एसटी कामगार मागे हटणार नाही. आझाद मैदानावर गेलो तिथे एक ताई आंदोलनात होत्या. ऑक्टोबरमध्ये त्यांच्या पतीने आत्महत्या केली होती. लोक आता मागे हटणार नाहीत. तुमच्या या लढ्यात पूर्ण महाराष्ट्र सोबत आहे. नक्की न्याय मिळणार, असेही त्यांनी नमूद केले.

किरीट सोमय्या गरजले...

  • परब फक्त टाईमपास करत आहेत

  • एसटी कामगारांच्या जीवाशी खेळ सुरूया

  • आघाडी सरकारला नाही सोडणार

  • एसटी कामगार मागे हटणार नाही

  • तिघाडी सरकारने वसुलीसाठी अड्डे निर्माण केले

  • सत्याला कोणी वाकवू शकत नाही

  • कामगारांना न्याय देण्याचे काम करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com