केजरीवालांचा बनवाट व्हिडीओ केला शेअर; संबित पात्रांवर कारवाईचे हायकोर्टाचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arvind kejriwal Vs sambit patra
केजरीवालांचा बनवाट व्हिडीओ केला शेअर; संबित पात्रांवर कारवाईचे हायकोर्टाचे आदेश

केजरीवालांचा बनवाट व्हिडीओ केला शेअर; संबित पात्रांवर कारवाईचे हायकोर्टाचे आदेश

Arvind Kejriwal Vs Sambit Patra : भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्लीतील न्यायालयाने दिले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा खोटा व्हिडीओ प्रसारित केल्याप्रकरणी न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. संबित पात्रा यांनी व्हिडीओशी छेडछाड करुन अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप, आम आदमी पक्षाने केला होता. (Delhi Court orders registration of FIR against Sambit Patra for posting doctored video of Arvind Kejriwal)

हेही वाचा: यूपीमध्ये राजकीय घडामोडींना वेग; समाजवादी पक्ष आणि रालोद येणार एकत्र?

हिंदी वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पक्षाने जानेवारी 2021 मध्ये भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी अरविंद केजरीवाल यांचा कथित खोटा व्हिडीओ समाज माध्यमात पोस्ट केल्यावर दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तसेच, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी केली होती. संबित पात्रा यांव्यतिरिक्त भाजपच्या अधिकृत ट्वीटर हँडलनेही हा व्हिडीओ ट्वीट केला होता.

हेही वाचा: 'संपूर्ण देशाला ममता बॅनर्जींसारख्या व्यक्तिमत्त्वाची गरज'

काय होता व्हिडिओ?

संबित पात्रा यांनी ट्वीट केलेल्या या व्हिडीओत, मुख्यमंत्री केजरीवाल मोदी सरकारने आणलेल्या नवीन तीन कृषी कायद्यांचे कौतुक करत असल्याचे दाखवले होते. हे कायदे 70 वर्षातील क्रांतिकारी निर्णय आहे, असेही म्हटलं होत. दरम्यान, आम आदमी पक्षाने या व्हिडीओवर आक्षेप नोंदवत, पात्रा खोटा प्रसार करत असल्याचं म्हटलं होत.

loading image
go to top