रत्नागिरी : वृद्धाला सळईने मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा

प्रकरणी संशयित तीन जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे
 वृद्धाला सळईने मारहाण
वृद्धाला सळईने मारहाणsakal

रत्नागिरी : शहरातील राजिवडा नाका येथे आत्महत्या केलेल्या मुलीबाबत विचारणा करणाऱ्या वृद्धाला लोखंडी सळईने मारहाण करुन जखमी केले. या प्रकरणी संशयित तीन जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. समीर नुरुद्दीन सोलकर, सैफुल्ला समीर सोलकर, साहिल समीर सोलकर (सर्व रा. कोकणनगर, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत.

ही घटना मंगळवारी (ता. २६) सकाळी अकरा ते साडेअकराच्या सुमारास राजीवडा नाका जैनुगल्ली येथे घडली. जैनुद्दीन अहमद सुवर्णदुर्गकर (वय ६५, रा. राजिवडा नाका रत्नागिरी) यांच्याकडे संशयित समीर नुरुद्दीन सोलकर हे बोटीवर तांडेल, म्हणून कामास होते. आठ दिवसांपूर्वी समीर यांच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे ते बोटीवर कामाला येत नव्हते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com