चिपळुणात मान्सूनपूर्व तयारीला प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळुणात मान्सूनपूर्व तयारीला प्रारंभ

चिपळुणात मान्सूनपूर्व तयारीला प्रारंभ

चिपळूण: महिनाभरात पावसाचे आगमन होणार असल्यामुळे चिपळूण पालिकेने मान्सूनपूर्व तयारीला सुरुवात केली आहे. मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे सुट्टीच्या दिवशीही बैठका घेत आहेत. पूरपरिस्थितीच्या काळात आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज ठेवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अवकाळी पावसाचा अंदाज घेत आठवड्यात आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज असेल अशी माहिती त्यांनी दिली.

मुसळधार पाऊस पडताच चिपळूण शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. यावर्षी तशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी मान्सूनपूर्व उपाययोजनेवर भर देण्यास सुरुवात केली आहे. रविवारी सुटी असूनसुद्धा त्यांनी पालिकेतील विभाग प्रमुखांची बैठक घेऊन पावसाळ्यातील कामांचे नियोजन केले. पूरपरिस्थिती रोखणे पालिकेच्या हातात नाही. मात्र, नागरिकांचे नुकसान कमी व्हावे यासाठी पालिकेकडून उपायोजना सुरू आहेत. पुरात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढता यावे यासाठी तरुणांना प्रशिक्षण दिले जात आहे. नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी लागणारी यंत्रणा दुरुस्त करून ती आपत्ती व्यवस्थापन विभागात सज्ज केली जात आहे. गेल्यावर्षी पूरपरिस्थिती निर्माण झाली तेव्हा पालिकेची बोट एका ठिकाणी आणि बोटीचे इंजन दुसऱ्या ठिकाणी होते तशी परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी पालिका घेत आहे. पावसाळ्यात शहरातील १३ प्रभागांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांचीआपत्ती व्यवस्थापनासाठी होतय सज्ज

आपत्ती व्यवस्थापनासाठी होतय सज्ज

नेमणूक केली आहे. हे अधिकारी दररोज प्रत्येक प्रभागातील रस्त्यावरील खड्ड्यांची, पाणी साचलेल्या नाल्यांची आणि धोकादायक इमारती आणि भिंतींची पाहणी करणार आहेत. कामात हलगर्जी होऊ नये, यासाठी या अधिकाऱ्यांनाच प्रत्येक प्रभागाचे पालकत्व सोपवण्यात आले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनाही या कामात समाविष्ट करण्यात आले आहे.

पालिकेची नालेसफाई अंतिम टप्यात आहे. मात्र, जे नाले पालिकेने स्वच्छ केले आहेत, त्यात नागरिकांनी पुन्हा कचरा टाकू नये. शहरातील नाल्यांची योग्य प्रकारे सफाई झाली आणि रोज नाल्यात जाणाऱ्या कचऱ्यावर नियंत्रण आले, तर पूरपरिस्थितीचा धोका कमी होईल. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांना आतापासूनच खबरदारीची पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- प्रसाद शिंगटे, मुख्याधिकारी चिपळूण पालिळूण पालिका

Web Title: Start Pre Monsoon Preparation Chiplun

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top