बिबट्यासोबत आम्ही जगायचे तरी कसे ? वनाधिकाऱ्यांच्या वक्तव्याला शेतकऱ्यांचा सवाल

the statement of forest officer live with leopards in konkan but the farmer also question to how survive with leopard in ratnagiri
the statement of forest officer live with leopards in konkan but the farmer also question to how survive with leopard in ratnagiri
Updated on

रत्नागिरी : बिबट्यासोबत (वाघ) लोकांनी जीवन जगायला शिकले पाहिजे, असे विधान वन खात्याच्या एका अधिकाऱ्याने केले. त्यासंदर्भातील वृत्त एका वृत्तपत्रात (‘सकाळ’ नव्हे) प्रसिद्ध झाले होते. या विधानाला विरोध दर्शवत, गणेशगुळे येथील शेतकरी विजय पटवर्धन यांनी बिबट्या शेतकऱ्यांची गाई-गुरे मारत आहे आणि त्याच्या भीतीमुळे शेती, बागायतीचे रक्षण करायला त्रास सहन करावा लागतोय. मग असे असताना बिबट्यांसोबत जगणे म्हणजे कठीणच आहे, असे म्हटले आहे.

त्यांनी सांगितले, वन्यजीव संरक्षकांनी वाघासोबत जीवन जगायला शिकले पाहिजे. ज्या प्रमाणे मुंगुस, ससे इत्यादी वन्यप्राण्याप्रमाणेच बिबट्यालाही आपण जंगली प्राणी म्हणून स्वीकारावे, असे आवाहन केले होते. परंतु गोरगरीब शेतकरी आपल्या मुलाप्रमाणे जनावरांवर प्रेम करतात. आपल्या डोळ्यांदेखत अतोनात हाल होऊन मरताना पाहताना त्यांची काय परिस्थिती होत असेल याचा विचार त्या वनाधिकाऱ्यांनी करावा.

सध्या रत्नागिरी तालुक्‍यातील कुर्धे, गणेशगुळे, मेर्वी, मावळंगे आणि इतर बऱ्याच भागात बिबट्याचा उपद्रव सुरू आहे. वनाधिकारी कोठेतरी बिबट्या पिंजऱ्यात पकडतात आणि त्याला घेऊन जातात. परंतु एक बिबट्या पकडल्याने प्रश्‍न संपत नाही तर असे अनेक बिबटे या परिसरात थैमान घालत आहेत. 
या संकटापासून दूर शहरात राहणाऱ्यांना याचा उपद्रव काय असतो, याची कल्पना येणे कठीण आहे, असेही पटवर्धन यांनी सांगितले.

हिंस्र प्राण्यांना जेरबंद करा

वनाधिकारी फक्त वन्यप्राणी संरक्षक म्हणूनच काम करतात की, मनुष्यहानी किंवा पाळीव प्राण्यांचे संरक्षण करण्यास ते असमर्थ तर नाहीत ना? अशी शंका येते. मनुष्यप्राण्यापेक्षा वन्यप्राणी अधिक महत्त्वाचे आहेत, असे वाटते. तरी वन विभागाने जो मानवाला उपद्रव देतो, शेती, बागांचे नुकसान करतो, अशा प्राण्यांना जेरबंद करून त्यांचा पूर्णपणे बंदोबस्त करावा, असे मत पटवर्धन यांनी व्यक्त केले.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com