esakal | 'आली गवर आली, सोन पावली आली' कोकणात दोन दिवसीय गौरींचे आगमन
sakal

बोलून बातमी शोधा

In Ganesh festival after two days mother of ganesha that is gauri comes in various villages in konkan

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून उत्सव साजरा होत आहे

'आली गवर आली, सोन पावली आली' कोकणात दोन दिवसीय गौरींचे आगमन

sakal_logo
By
प्रमोद हर्डीकर

साडवली : कोकणात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून उत्सव साजरा होत आहे.  संगमेश्वर तालुक्यात गणोशोत्सवात गौरी पुजनालाही तितकेच महत्व आहे. गणेशाची माता पार्वतीचे गौरी हे रुप आहे. वर्षातून दोन दिवस गौरी माहेरी राहण्यासाठी येते अशी मानले जाते.  मंगळवारी दुपारपासुनच महिलांनी गौरी आणल्या व त्याचे विधिवत पुजन सुरू केले.

हेही वाचा - माहेरावरील प्रेमाच्या ओढीने गौराई आली; पारंपरिक गाणी गात आगमन...

विवाहीत महिला आपल्या सौभाग्याचं लेणं मागण्यासाठी आणि कुमारीका आपल्याला चांगले सौभाग्य मिळावे यासाठी गौरी पुजा व्रत करतात. संगमेश्वर तालुक्यातही गौरी आवाहन करुन गौरी आणल्या जातात. काही ठिकाणी विहीरीवरुन, नदीवरुन सात खड्यांच्या रुपात गौरी आणली जाते. तर काही ठिकाणी गौरीचे मुखवटे सुंदर साडी, चोळीने सजवुन त्यांची पुजा व आराधना केली जाते. गौरी पुजनात गौरीला गोडाचा तसेच काही ठिकाणी तिखटाचा नैवेद्य केला जातो. 

हेही वाचा -  तब्बल चार महिन्यानंतर धावली शिवशाही...

हे दोन दिवस गौराईला गणेशाच्या शेजारी पुजनाचा मान मिळतो. गणपतीसोबतच गौराईची आरती, विविध गीते, गाणी म्हटली जातात. आणि या सगळ्यात महीलाच पुढाकार घेवून गौराईची आराधना करतात. गणेश विसर्जनादिवशीच गणेशाबरोबर गौरीचे विसर्जन केले जाते. २७ तारखेला गणपती आणि गौरीचे विसर्जन होणार आहे. कोरोना पर्वामुळे यावर्षी उत्सवाला शांततेचे स्वरुप आले आहे. तरीही नियमांचे पालन करत या सणाची  पंरपरा जपली जात आहे हेच या उत्सवाचे महत्व आहे. 

संपादन - स्नेहल कदम