कोकणात दीड गुठ्यांत बहरतीये स्ट्रॉबेरीची शेती ; माजी आमदारांच्या मुलाचा प्रयोग

strawberry farming start one youth in ratnagiri one and half guntha
strawberry farming start one youth in ratnagiri one and half guntha

चिपळूण (रत्नागिरी) : कोकणात स्ट्रॉबेरीची शेती कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय ठरली आहे. माजी आमदारांचा मुलगा पुष्कर याने गांग्रई येथे स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड केली आहे. त्यांचा हा प्रयोग कोकणातील पारंपरिक शेतीला नवीन दिशा देणारा ठरणार आहे. पुष्कर चव्हाण सध्या खरवते येथील कृषी महाविद्यालयात शेतीशास्त्राविषयीचे शिक्षण घेत आहेत. परंतू शेतीची आवड असल्याने शिक्षण घेत असताना त्याने गांग्रई येथे प्रयोग राबवण्यास सुरवात केली. 

आंबा, काजू, कोकम, भाजीपालासह इतर वेगवेगळे पीक घेत असताना नवीन प्रयोगही त्यांनी केले. वडिलांना शेतीची आवड असल्याने त्यांनी मुलाला शेतीमध्ये प्रोत्साहन दिले. पुष्करने वाई (जि. सातारा) येथून स्ट्रॉबेरीची 500 रोपे आणली. दीड गुंठे जागेत त्याने स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. स्ट्रॉबेरीच्या शेतीची ऑनलाईन माहिती घेतली. वाईतील मित्रांशी संपर्क करून त्याने स्ट्रॉबेरीसाठी लागणार्‍या पाण्याचे आणि खतांचे नियोजन केले. या आठवड्यात स्ट्रॉबेरीचे फळ तयार झाले असून प्रत्येक वेलीवर सात ते आठ फळ येत आहेत. 

पुढील तीन महिने स्ट्रॉबेरी हंगाम चालणार आहे. त्यामुळे चांगले उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे. कोकण स्ट्रॉबेरी या नावाने ते स्ट्रॉबेरीचे ब्रॅंड तयार करून भविष्यात मुंबईतील बाजारपेठ मिळवणार असल्याची माहिती पुष्कर चव्हाण यांनी दिली. कृषीच्या पदवीचे शिक्षण घेत असताना पुष्करने स्ट्रोबेरीची यशस्वी लागवड केली. 

"शेतकर्‍यांनी गट स्थापन करून स्ट्रॉबेरीची लागवड केली तर ती किफायतशीर ठरू शकते. यासाठी शासकीय अधिकार्‍यांमार्फत शेतकर्‍यांचे प्रबोधन करता येईल. संबधित स्थळावर चिपळूण तालुक्यातील शेतकर्‍यांची एक सहल करावी अशी सूचना मी कृषी अधिकार्‍यांना केली असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. शेतकर्‍यांनी गट स्थापन करून जरी स्ट्रॉबेरीच्या विक्री व्यवस्थापनाकडे लक्ष दिले तर हे उत्पादन चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकेल."

- सदानंद चव्हाण, माजी आमदार

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com