Sawantwadi : वीज उपअभियंत्यास जमावाकडून मारहाण; मळेवाडमध्ये प्रकार, चौघांवर गुन्हा, मारहाणीच काय कारण?

उपकेंद्रात घुसून उपअभियंता अंकुश कौरवाल यांच्या शर्टाची कॉलर पकडून कंट्रोल रुमच्या बाहेर ओढत आणले. त्यांना जमिनीवर पाडून मारहाण केली. याबाबतची तक्रार संबंधित अधिकारी कौरवाल यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात दिली.
Scene from Malewadi where an electricity sub-engineer was attacked by a mob over a reported power issue; four booked.
Scene from Malewadi where an electricity sub-engineer was attacked by a mob over a reported power issue; four booked.Sakal
Updated on

सावंतवाडी : वीजपुरवठा खंडित झाल्याच्या रागातून मळेवाड वीज उपकेंद्राचे उपअभियंता अंकुश विजयराव कौरवार (वय ४५) यांना कार्यालयात घुसून संतप्त ग्रामस्थांच्या जमावाने मारहाण केली. हा प्रकार सोमवारी (ता. २८) रात्री साडेदहाच्या सुमारास मळेवाड उपकेंद्रात घडला.

याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी समीर केरकर (रा. तळवणे), काका आचरेकर व बाबाजी अंकुश नाईक (दोघे रा. आरोंदा) व अन्य एक अनोळखी व्यक्ती अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : मळेवाड उपकेंद्राच्या परिसरात येणाऱ्या ग्रामीण भागात सोमवारी रात्री (ता. २८) उशिरा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यातील तांत्रिक बिघाड शोधण्यासाठी महावितरणचे पथक कार्यरत होते.

त्यानंतर दहाच्या सुमारास वीजपुरवठा सुरू झाला; मात्र यावेळी त्या ठिकाणी आलेल्या जमावाने केंद्रातील कर्मचाऱ्यांशी वाद घातला. उपकेंद्रात घुसून उपअभियंता अंकुश कौरवाल यांच्या शर्टाची कॉलर पकडून कंट्रोल रुमच्या बाहेर ओढत आणले. त्यांना जमिनीवर पाडून मारहाण केली. याबाबतची तक्रार संबंधित अधिकारी कौरवाल यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अरवारी तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com