

Chiplun Political Meeting
esakal
चिपळूण: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटना मजबूत करण्यासाठी आतापासूनच आक्रमकपणे कामाला लागा आणि प्रत्येक मतदारापर्यंत पक्षाची भूमिका पोहोचवा, असे आवाहन माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघ जिंकण्याचे लक्ष्य ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.