कोकण रेल्वे मार्गावर वालोपेत सबस्टेशन 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 June 2019

चिपळूण - कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाच्या कामास वेग आला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते रत्नागिरी दरम्यान खांब उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. चिपळूणातील वालोपे रेल्वेस्थानजवळ सबस्टेशन उभारण्यात येत असून येथील विद्युतीकरणाचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. 

चिपळूण - कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाच्या कामास वेग आला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते रत्नागिरी दरम्यान खांब उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. चिपळूणातील वालोपे रेल्वेस्थानजवळ सबस्टेशन उभारण्यात येत असून येथील विद्युतीकरणाचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. 

कोकण रेल्वे मार्गावर वेगवान प्रवास होण्यासाठी मार्गाचे दुपरीकरण तसेच विद्युतीकरण व्हावे,अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून सुरू होती. कोकणचे सुपुत्र तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कार्यकाळात या मागणीस चालना मिळाली. या कामासाठी आवश्‍यक असलेला निधी बजेटमध्ये समाविष्ट करण्यात आला.प्रभू यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात रायगडमध्ये कोकण रेल्वे मार्गाचे दुपरीकरण आणि विद्युतीकरण कामाची सुरूवात 2015 मध्ये झाला होता.

कोरेच्या दुपरीकरण आणि विद्युतीकरण कामास मंजुरी मिळाल्यानंतर 2016 मध्ये खऱ्या अर्थाने या कामास सुरवात झाली. यातील दुपरीकरणाचे काम टप्प्या टप्प्याने करण्यात येत आहे. तर कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम सर्वत्र सुरू आहे. रोहा ते रत्नागिरी दरम्यानच्या मार्गावरील विद्युतीकरणासाठी आवश्‍यक असलेले खांब जवळपास पूर्ण उभारले आहेत. कोरेच्या दक्षिण टोकाकडूनही विद्युतीकरणाचे काम वेगाने हाती घेण्यात आले आहे. विद्युत खांब टाकून पूर्ण झालेल्या रोहा ते रत्नागिरी दरम्यान लवकरच ओव्हरहेड विद्युत वाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. 

क्रॉसिंगसाठी लागणारा वेळ वाचणार 
सध्या कोकण रेल्वेचा मार्ग एकेरीच आहे. मालगाड्या तसेच प्रवासी गाड्यांचा वाढलेला ताण लक्षात घेत मार्गाचे पॅच डबलिंग तसेच जास्त अंतर असलेल्या दोन स्थानकामध्ये 11 नवीन स्थानकांची निर्मिती करण्यात येत आहे. या स्थानकामध्ये जिल्ह्यातील कळबंणी, असुर्डे, कडवई, वेरवली, या स्थानकांचा समावेश आहे. नव्या स्थानकामुळे एकेरी मार्गावर गाड्यांच्या क्रॉसिंगसाठी लागणारा वेळ वाचणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Substation in Walope on Konkan Railway route