पुनश्च हरिओमने रत्नागिरीच्या निखिलचा करिअरचा उघडला दरवाजा

पुनश्च हरिओमने रत्नागिरीच्या निखिलचा करिअरचा उघडला दरवाजा

रत्नागिरी : चित्रपट निर्मितीतील तांत्रिक अंगामध्ये करिअर करता येते, याचा वस्तुपाठ रत्नागिरीचा सुपुत्र निखिल पाडावे याने घालून दिला आहे. पुनश्च हरिओम् या चित्रपटाचे संकलन स्वतंत्रपणे निखिलने केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चित्रपट संकलक म्हणून आपली मुद्रा कोरणारा निखिल हा बहुदा पहिला तरुण आहे. लॉकडाऊन काळात रत्नागिरीमध्ये वैभव मांगले यांच्यासह एक गाव भुताचा ही मालिका त्याने बनवली. लॉकडाऊननंतर पुन्हा आयुष्य सुरू कसे करायचे, यावरचा हा चित्रपट त्याला मिळाल्याने या क्षेत्रातील त्याचे हरिओमही आगळेवेगळे ठरणार आहे.(success-story-nikhil-padave-career-technical part-filmmaking-vaibhav-mangale-ratnagiri

महाविद्यालयीन शिक्षण रत्नागिरीतच घेतलेल्या या तरुणाची ही वाटचाल इतर तरुणांना आणि कलाकारांना स्फूर्तिगाथा ठरू शकेल. ११ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाच्या संकलनात अनंत कामत यांनी त्याला साह्य केले आहे. निखिलचा पिंड कलाकाराच. नृत्य आणि अभिनय यामध्ये त्याला प्रथमपासून रस होता. रत्नागिरीतील गोगटे महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करताना विद्यापीठ पातळीवर त्याने स्कीटसाठी सुवर्णपदक मिळवले आहे. पण ते अभिनयात. याशिवाय एकांकिका आणि स्पर्धा यामध्ये त्यांनी अभिनयात छाप पाडली. त्याचा नातेवाईक अमित देवळे याच्याकडून त्याने स्फूर्ती घेतली. तो अॅनिमेशन उत्तम करत असे. त्यानंतर मुंबईत जाऊन त्याने अॅनिमेशन आणि फिल्म मेकिंग याचा डिप्लोमा केला. त्यानंतर इंटर्नशीप केली. त्यादरम्यान दूरदर्शनवरचे काही शो, मालिका यांच्यासाठी बॅकस्टेजवर काम केले. संकलन करताना सहाय्यक म्हणून काम करताना बारीक बारीक गोष्टी कशा महत्त्वाच्या ठरतात, हे शिकल्याचे त्याने सांगितले.

एक गाव भुताचा या मालिकेचे चित्रीकरण रत्नागिरीत नाचणे परिसरात झाले. मुंबईतून तंत्रज्ञ, दिग्गज लेखक, कलाकार, दिग्दर्शक कोणीही येऊ शकत नव्हते. वैभव मांगले हेच खणखणीत नाणे. त्यामुळे सबकुछ रत्नागिरी संच असलेल्या आमच्यावर सुनील भोसले यांनी विश्वास टाकला. हे माझे पहिले स्वतंत्र काम. त्यामुळे आत्मविश्वास वाढला. वैभव मांगले यांनाही माझे काम आवडले. या कामातून संकलक म्हणून माझी कामगिरी या क्षेत्रातील जाणत्यांच्या नजरेत आली आणि त्यामुळे पुनश्च हरिओम् माझ्यासाठी शब्दशः तसाच ठरला.

तंत्रज्ञाची गरज सततच

तंत्रज्ञानाची आवड आणि चिकाटी यामुळे अभिनयाऐवजी संकलनाकडे वळलो. आणखी एक गोष्ट, अभिनेता काही काळ इंडस्ट्रीपासून बाजूला जाऊ शकतो, मात्र तंत्रज्ञ बॅकस्टेजला असला तरी त्याची गरज सतत लागते. त्यामुळे या करिअरकडे वळलो आणि स्थिरावलो, असे निखिलने सांगितले.

एक गाव भुताचा..दोन्ही भूमिका

लॉकडाऊनने अनेकांचे मार्ग लॉक झाले, पण निखिलसाठी मात्र हा अनलॉकचा अनुभव ठरला. वैभव मांगले त्या काळात रत्नागिरीत होते. सुनील भोसले यांच्या सोमिल क्रिएशनतर्फे एक गाव भुताचा ही मालिका त्याने केली. विशेष म्हणजे दिग्दर्शक आणि संकलक या दोन्ही भूमिका निखिलने पार पाडल्या. मांगले यांना दिग्दर्शन करताना छाती दडपून गेली, परंतु त्यांच्या वागण्याने कधीच भीती वाटली नाही आणि कामही उत्तम झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com