
साडवली : ज्या काळात वाहतूकीसाठी फारशी साधने नव्हती आणि संपर्क माध्यमे पण जास्त अस्तित्वात नव्हती अशा काळात त्यांनी देवरुख सारख्या छोट्याशा गावात वृत्तपत्र विक्रिला सुरुवात केली. आज बघता बघता त्यांच्या या वाटचालीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. देवरुखमधील प्रतिज्ञा न्युज पेपर एजन्सीचे मालक चंद्रकांत शेट्ये यांची हि कहाणी.
१९६९ साली देवरुखमधील प्रतिज्ञा बिल्डिंगमधे असलेल्या डॉक्टर आठल्ये यांचा वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय होता. तो त्यांनी चंद्रकांत शेट्ये यांच्याकडे सुपूर्द केला. १ मे १९७० साली त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली. तेव्हा देवरुखमधे केवळ महाराष्ट्र टाईम्स व लोकसत्ता ही दैनिक यायची . ते ही ६ पानाचे त्याची किम्मत होती ४ आणे. रविवारचा लोकसत्ता ३० पैशात मिळायचा. ग्राहकाचे महिन्याचे बिल ८ रुपये व्हायचे. यात विशेष म्हणजे आजचा पेपर सकाळी न येता तो सकाळी मुंबईतुन येणाऱ्या एसटीने संध्याकाळी देवरुख आगारात यायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी याचे वितरण व्हायचे. त्यावेळी २५ पेपरचे पार्सल यायचे.
घरपोच केले वितरण
त्यावेळी ते स्वतः सायकलने पेपर टाकत होते. १० वर्षे त्या बिल्डिंग मधून सेवा देताना त्यांनी केसरी, मुंबई तरुण भारत, मटा, लोकसत्ता आदी पेपरचे वितरण केले. यानंतरच्या काळात दळण वळणाची साधने वाढली मग जिल्हास्तरीय वर्तमानपत्रे येउ लागली. १९८० साली त्यांनी देवरुख एस टी स्थानकावर त्यांनी पेपर स्टॉल सुरु केला. जवळपास ४० वर्ष त्यांनी या स्टॉल वरुन वाचकांना दैनिक, साप्ताहिक, मासिक, पाक्षिक आदी उपलब्ध करून देत त्याचे घरपोच वितरण केले.
कुटुंबाचा असाही आधार
आपल्या व्यवसायाबद्द्ल बोलताना शेट्ये सांगतात कि , आम्हाला सुट्टी कधिच नव्हती मात्र उन पावसाची तमा न बाळगता हा व्यवसाय केला. यात पत्नी, २ मुली , २ मुलगे आणि सुन यांनी कायम मदतच केली. याच व्यवसायावर त्यांची शिक्षण, लग्न केली. आज हि सगळी मुले स्थिरस्थावर आहेत. व्यवसाय करताना प्रामाणिकपणा जपला. त्यामुळे अनेक कुटुंबाशी जोडला गेलो. जोपर्यंत अंगात ताकद आहे तोपर्यंत वाचकांसाठी हा व्यवसाय करतच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.