esakal | चिपीत विमानाची लॅडिंग चाचणी यशस्वी
sakal

बोलून बातमी शोधा

Kokan

चिपीत विमानाची लॅडिंग चाचणी यशस्वी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कुडाळ : चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ (Airpot) शनिवारपासून सुरू होत असून, त्याची लँडिंग चाचणी आज घेण्यात आली, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता विमानतळ उद्घाटन सोहळा निमंत्रितांच्या उपस्थितीत होत आहे.

राऊत यांनी दोन दिवसांपूर्वीच पाहणी केली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर यांच्यातर्फे कार्यक्रमाचे नियोजन आहे. राज्य, केंद्राचे मंत्री प्रमुख अधिकारी यांच्यासाह जिल्ह्यातील काही प्रमुख मंडळी निमंत्रित असतील. शनिवारी एअर अलायन्सचे ७२ सीट विमान येणार आहे. त्याची आज सिंधुदुर्ग विमानतळावर लँडिंग चाचणी घेण्यात आली. विमान गोवा येथून सिंधुदुर्ग विमानतळावर आले.

हेही वाचा: सिंधुदुर्ग-मुंबई विमान प्रवास 2500 रुपयात;पाहा व्हिडिओ

यामध्ये पायलट व तंत्रज्ञ होते. हेच विमान दिवसा मुंबई ते सिंधुदुर्ग विमानतळ असा प्रवास करेल, अशी माहिती राऊत यांनी दिली.

loading image
go to top