रत्नागिरी पालिका पोटनिवडणुकीचा खर्च सेनेकडून वसूल करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जून 2019

रत्नागिरी - जनतेतून पाच वर्षांसाठी थेट नगराध्यक्ष म्हणून शिवसेनेचे राहुल पंडित यांना निवडून दिले आहे. मात्र, शिवसेनेने अंतर्गत वाटाघाटीसाठी पंडित यांचा राजीनामा घेतला. आता पुन्हा पोटनिवडणूक जनतेवर लादली आहे. पोटनिवडणुकीवर होणारा अतिरिक्त खर्च शिवसेना पक्षाकडून पालिका फंडात भरून घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते तथा तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी केली आहे. 

याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी व पालिका प्रशासनाला सादर केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पत्रकार परिषदेत त्यांनी याची माहिती दिली. मयेकर म्हणाले, पालिकेची 2016 ला सार्वत्रिक निवडणूक झाली. जनतेतून थेट नगराध्यक्षपदी शिवसेना पक्षाच्या अधिकृत चिन्हावर राहुल पडिंत हे निवडून आले होते. पाच वर्षांसाठी जनतेने त्यांना निवडून दिले होते. परंतु नगराध्यक्ष राहुल पंडित यांना पक्षांच्या आदेशावरून 27 मे 2019 नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पक्षांतर्गत झालेल्या अडिच-अडिच वर्षांच्या वाटाघाटीवरून सेनेने हा निर्णय घेतला. राहुल पंडित यांना पाच वर्षांसाठी रत्नागिरी शहरावसायींनी निवडून दिले होते. शहरातील नागरिकांना पुन्हा निवडून देण्यासाठी पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. 

अतिरिक्त खर्च भरुन घ्यावा 
पक्षांतर्गत निर्णयासाठी नागरिकांना सेनेने वेठीस धरले आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी पालिकेला फंडातून लाखो रुपये खर्च होणार आहे. राहुल पंडित यांच्या राजीनाम्यामुळे शहरवासीयांवर सेनेने ही निवडणूक लादली आहे. पालिकेवर पडणारा हा अतिरिक्त खर्च शिवसेना पक्षाकडून पालिकेच्या फंडामध्ये भरून घ्यावा. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sudesh Mayekar press