Leopard Sighting Sparks Panic in Pachapur and Surrounding Villages
sakal
पाली : सुधागड तालुक्यातील पाच्छापूर परिसरात रविवारी (ता.18) रात्रीच्या सुमारास एक मादी बिबट्या आणि तिची तीन पिल्ले आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पाच्छापूर सह आजूबाजूच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात माहिती मिळताच तालुका वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी लागलीच घटनास्थळी भेट दिली. तसेच नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.