
कोकणी संस्कृती आणि कोकणची ओळख असणाऱ्या दशावतारी नाटकांमध्ये भूमिका साकारणारे दशावतारी नट सुधीर कलिंगण यांचं निधन झालं आहे. ते ५३ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून सुधीर कलिंगण (Sudhir Kalingan) यांची प्रकृती बिघडली होती. अखेर पहाटे दोनच्या सुमारास सुधीर कलिंगण यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे आता कोकणातील दशावतार लोककलेवर शोककळा पसरली आहे. दशावतार नाटकात विविध भूमिका साकारणारे नट अचानक गेल्याने या क्षेत्रातील अनेकांना अश्रु अनावर झाले आहेत.
सुधीर कलिंगण (Sudhir Kalingan) यांच्यावर गोव्यातील एका खासगी रुग्णालयता उपचार सुरु होते. त्यांच्या निधनामुळे दशावतारी नाट्यक्षेत्राचा एक मोठा आधारस्तंभ हरवला असल्याची प्रतिक्रिया कोकणातील नाटक क्षेत्रातून व्यक्त होत आहे. सुधीर कलिंगण हे सुविख्यात दशावतारी नट बाबी कलिंगण यांचे सुपूत्र होते. सुधीर कलिंगण यांनी आपल्या वडिलांचा वारसा समर्थपणे पुढे नेला. नवीन नाट्यनिर्मिती सादर करून त्यांनी आपला ठसा उमटवला.
दरम्यान, कोकणची लोककला दशावतार ही टिकवण्यासाठी सुधीर कलिंगण हे नेहमीच नविन कलाकारांना मार्गदर्शन करायचे. सुरुवातीस वनराज नाटकात बालवनराजच्या भूमिकेतून त्यांनी रंगमंचावर प्रवेश केला. त्यात चिलियाबाळ, रोहिदास आदी भूमिकाही केल्या. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी १९८६ साली स्वतंत्र कलेश्वर दशावतार नाट्य कंपनी काढली. यात ते काम करु लागले. त्यांनी बऱ्याचवेळा स्त्रीपात्राच्या भूमिकाही साकारल्या आहेत. हे सगळं करत असताना दिवसभर एसटी विभागात चालकाची भूमिकाही त्यांनी सक्षमपणे सांभाळली होती. त्यांच्या अकाली निधनाने कोकणातील दशावतार केलेला मोठी हानी झाली आहे. त्यामुळे कोकण लोकराजाला पोरका झाला असल्याची भावना व्यक्त होतं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.