
हा तरुण भाडेकरू म्हणून या ठिकाणी राहात होता.
चिपळूण (रत्नागिरी) : खोलीतून प्रचंड दुर्गंधी येत असल्याने चाळमालकाने खोलीचे दार मागच्या बाजूने तोडले. मात्र, त्यांना समोर पंख्याला लटकलेला आणि पूर्ण सडलेला मृतदेह आढळून आला. ही घटना खेर्डी-मिरगल चाळीमागे घडली असून याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा तरुण भाडेकरू म्हणून या ठिकाणी राहात होता.
याबाबत हकीकत अशी की, मूळचा गुढे येथे राहणारा अमोल महादेव रहाटे (वय ३८) खेर्डी येथे भाड्याने राहात होता. त्याची पत्नी आणि मुले माहेरी निघून गेले आहेत. काही वर्षे त्याची आई आणि तो या ठिकाणी राहात आहेत. वर्षभरापूर्वी त्याच्या आईचे निधन झाल्याने तो एकटाच होता. त्यामुळे व्यसनाच्या आहारी गेला होता. काही दिवस तो आजारी होता. त्याला कामथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून तो घरी आला.
हेही वाचा - माझ्या जीविताला धोका आहे, कमी जास्त झाल्यास राज्य सरकार जबाबदार; नारायण राणे -
त्यानंतर त्याने ओढणीच्या साह्याने गळफास घेत जीवन संपवले. मात्र, याची कल्पना कोणालाच नव्हती. चाळीत दुर्गंधी सुटल्यामुळे वास कोठून येतो, म्हणून शोध घेतला असता रहाटे याच्या खोलीतून येत असल्याचे समजले. मात्र, दरवाजे बंद असल्याने मागच्या बाजूने दार उघडण्यात आले. त्यावेळी पंख्याला लटकलेला मृतदेह आढळून आला.
संपादन - स्नेहल कदम