कोकणातील हापूस आंबा 10 टक्के करपला; उष्णतेच्या लाटेचा परिणाम

summer atmosphere effects on mango in ratnagiri
summer atmosphere effects on mango in ratnagiri

रत्नागिरी : गेले आठवडाभर पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत स्थिर राहिल्याने तयार झालेला दहा टक्‍के आंबा पिक करपून गेलं आहे. फळावर खड्‌डे पडले असून उष्णतेमुळे आतील भागात साका होत आहे. आंबा वाचविण्यासाठी केलेला खर्च व्यर्थ गेल्यामुळे मध्यमवर्गीय बागायतदारांवर मोठी आपत्ती कोसळली आहे.
मार्च महिना सुरू झाला आणि उष्मा दिवसागणिक वाढू लागला. रत्नागिरी जिल्ह्याचे तापमान ३४ ते ३६ अंशापर्यंत राहते. हे तापमान हापूसला पोषक आहे. मात्र, त्यात वाढ झाली की त्यांचे गंभीर परिणाम उत्पादनावर होतात.

यंदाचा हंगाम सुरवातीपासूनच बागायतदारांसाठी पोषक नव्हता. 
एक महिना उशिराने पीक आले आहे. ऐन हंगामात अवकाळी पावसाने हजेरी लावली, थंडीचा पत्ताच नाही. गारपीटीने काही भागात नुकसान केले. बदलत्या हवामानामुळे उत्पादनच कमी होते. या परिस्थितीत मार्च महिन्यात उष्णतेची उच्चांकी नोंद झाली आहे. यंदा आधीच पिक कमी असल्यामुळे बागायतदार धास्तावलेला असतानाच उष्णतेच्या लाटेची आपत्ती ओढवली आहे. त्यामुळे आंबा उत्पादक अडचणीत आला आहे. सध्याच्या परिस्थितीचा महूसल आणि कृषी विभागाने सर्व्हे करून अहवाल तयार शासनाला सादर करावा, अशी मागणी बागायतदार 
करत आहेत.

संवेदनशील हापूसवर दुष्पपरिणाम

मार्चमध्ये पारा ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत गेला होता. याचा परिणाम संवेदनशील हापूसवर झाला असून आंबा झाडावरच भाजून गळून जात आहे. आंब्यावर काळे डाग आणि खड्डे पडत आहेत. पीक वाचवण्यासाठी चार ते पाच वेळा औषध फवारणीही केली गेली होती. त्याचा खर्च वाया गेला आहे. उष्म्यामुळे १० टक्‍के पीक करपून गेल्याचा अंदाज व्यक्‍त केला जात आहे.

"यंदाच्या हंगातील परिस्थिती शासनाच्या प्रतिनिधींपुढे वारंवार मांडली आहे; परंतु याची गंभीर दखल घेतलेली नाही. पुढील वर्षी बागायतदार उभा राहावा, असे वाटत असेल तर शासनाने आवश्‍यक ती सूट बागायतदारांना द्यावी."

- तुकाराम घवाळी, बागायतदार

एक नजर

  • जिल्ह्याचे तापमान ३४ ते ३६ अंशापर्यंत राहते
  • त्यात वाढ झाल्यास गंभीर परिणाम उत्पादनावर
  • हंगाम प्रारंभापासूनच बागायतदारांसाठी अपोषक
  • एक महिना उशिराने पिक आले, थंडीचा पत्ताच नाही
  • ऐन हंगामात अवकाळी पावसाने हजेरी लावली
  • मार्च महिन्यात उष्णतेची उच्चांकी नोंद 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com