
-अमित गवळे
पाली : जैवविविधतेने नटलेले विलोभनीय निसर्ग सौंदर्य व विस्तीर्ण समुद्र किनारा तसेच ऐतिहासिक व धार्मिक स्थळे यामुळे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची पावले रायगड जिल्ह्याकडे वळतात. संपूर्ण मे महिन्यात पावसामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला. आता पावसाने थोडी उसंत घेतली आहे तसेच उन्हाळी सुट्ट्या संपत आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यामधील पर्यटन स्थळे पर्यटकांनी बहरली आहेत. उन्हाळी पर्यटनाचा हा अखेरचा टप्पा असून 4 ते 5 दिवसांनी पर्यटकांची पावले परतीच्या मार्गाला लागतील.