esakal | आता शिवसेना गप बसणार नाही; उपजिल्हाप्रमुखांचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

आता शिवसेना गप बसणार नाही; उपजिल्हाप्रमुखांचा इशारा

आता शिवसेना गप बसणार नाही; उपजिल्हाप्रमुखांचा इशारा

sakal_logo
By
दिपेश परब

वेंगुर्ले (सिंधुदु्र्ग) : येथील नगरपरिषद मच्छिमार्केटची जुनी इमारत पाडताना त्यामध्ये असलेल्या गाळेधारकांना पुन्हा त्याच ठिकाणी गाळे देण्याचे ठरले होते. तसा ठरावही करण्यात आला होता; मात्र आज या ठरावाची पायमल्ली करण्यात येत आहे. जुन्या गाळेधारकांच्या पोटावर पाय आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्थानिक व्यापाऱ्यांना डावलून धनदांडग्यांना गाळे देण्याचा प्रयत्न केला गेल्यास शिवसेना गप बसणार नाही, असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे यांनी दिला आहे. डुबळे यांनी येथील तालुका संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, ज्या नगरसेवक व नगराध्यक्ष यांना लोकांनी निवडून दिले, त्या लोकप्रतिनिधींनी आपले अधिकार मुख्याधिकाऱ्यांना दिले. मुख्याधिकाऱ्यांनी कायद्याचा बडगा दाखवून व खोट्या भूलथापा देवून गाळे काढून घेतले. त्यानंतर गाळेधारकांना जी पर्यायी जागा दिली ती नादुरुस्त व गळकी होती. आज त्यांना लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी तात्पुरते देण्यात आलेले गाळे खाली करण्याची अट घालण्यात आली आहे.

हेही वाचा: जाणून घ्या: बिर्याणीत वापरल्या जाणाऱ्या पुदिनाविषयी

व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ ज्यावेळी आमदार दिपक केसरकर, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांना भेटले त्यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन गाळेधारकांना राईट टू रिफ्यजलचा हक्क मिळवून दिला. यापूर्वी २००७ मध्ये आयडीएसएमटी मार्केट बांधतेवेळी व्यापाऱ्यांना असेच आश्वासन देण्यात आले होते; मात्र त्यांना हक्काचे गाळे आजपर्यंत देण्यात आले नाहीत. या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी हा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या पत्रकार परिषदेला तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, शहरप्रमुख अजित राऊळ, शहर समन्वयक विवेक आरोलकर, डॅलिन डिसोजा, जिल्हा कार्यकारीणी सदस्य सचिन वालावलकर, शैलेश परुळकर, हेमंत मलबारी आदी उपस्थित होते.

loading image
go to top