esakal | जाणून घ्या: बिर्याणीत वापरल्या जाणाऱ्या पुदिनाविषयी
sakal

बोलून बातमी शोधा

जाणून घ्या: बिर्याणीत वापरल्या जाणाऱ्या पुदिनाविषयी

जाणून घ्या: बिर्याणीत वापरल्या जाणाऱ्या पुदिनाविषयी

sakal_logo
By
अमोल सावंत : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूरच्या मंडईत वर्षभर पुदिना मिळतो; पण पुदिन्याचा हा प्रकार नेमका कोणता हे अनेकांना माहिती नसते. मटण, मटण बिर्याणीसाठी तर पुदिना हवाच. नुसते पुदिन्याची पेंडी द्या, असे म्हणून तो आपण विकत घेतो. प्रत्येकाच्या जेवणात पुदिना वापरला जातो. पुदिन्याची शेती जिल्ह्यात तुरळक प्रमाणात दिसते. खरे तर पुदिन्याच्या उत्पन्नातून मोठा आर्थिक स्रोत परिसरात तयार होतो; पण कुणाचेही याकडे लक्ष नाही. कोणी आपल्या परसदारी, बागांत पुदिना वाढवत नाही. खरे तर पुदिन्याची पेंडी विकली तर घरी अर्थस्रोत तयार होतो. पुदिन्याची शेती करण्याची इच्छा मात्र हवी.

पुदिना कोठून येतो?

मिरज, पुणे, बेळगाव, शिरोळ, करवीर तालुका.

प्रकार

पहाडी पुदिना, इंडियन स्पिअरमिंट, लँब मिंट, ग्रीन मिंट, मेंथा स्पायकॅटा, मेंथा अर्व्हेन्सिस, जपानी पुदिना, मेंथा पायपेरेटा, गमाथी पुदिना, बगमॉट मिंट असे प्रकार आहेत. पुदिनाचे लॅटिन नाव मेंन्था विहरीडीस असून, हिचे लॅटिन कूळ लॅमिएसी आहे.

जाती किती?

मेंथा या शास्त्रीय नावाच्या वंशातील सुमारे २५ जाती सर्वत्र पसरल्या आहेत. या जाती सर्वच सुगंधी असून, अमेरिकेशिवाय इतरत्र मुख्यतः समशीतोष्ण प्रदेशात आढळतात. जातींत विविधता असून, परस्परांतील संकरामुळे कित्येक संकर अन्‌ वाण आहेत. पुदिन्याची बागेत, शेतात लागवड केली जाते. भारतात मेंथा अर्व्हेन्सिस व्यतिरिक्त आणखी पाच जाती आहेत. पुदिना ही मुळची युरोप, पश्‍चिम, मध्य आशिया येथील आहे. यानंतर तो अनेक माध्यमातून भारतात आला.

बागेत आढळणारे वाण

गार्डन मिंट, पेपरमिंट, स्पर्ममिंट, अननस पुदिना, ॲपल पुदिना (वूली पुदिना), पेनीरोयल, आले पुदिना, घोडा लाल, रॅरिपिला पुदिना, कॅटमिंट, चॉकलेट पुदिना, केशरी पुदिना, लव्हेंडर पुदिना, ग्रेपफ्रूट पुदिना, विपत्ती, ज्येष्ठमध मिंट, तुळस पुदिना, च्युइंग गम मिंट, वॉटरमिंट, कॉर्न किंवा फील्ड पुदिना असे प्रकार आहेत.

पुदिन्याचा उपयोग

खाद्य उद्योगात साबण उद्योगात पोटदुखी, अर्धशिशी, सांधेदुखी, बद्धकोष्ठ, अतिसार, पोटातील व्रण, सर्दीवर लघवी साफ होते डोकेदुखी, दातदुखी, वातविकारावर गुणकारी मिंट तेलाचा सौंदर्यप्रसाधनांत वापर तेलात ७० टक्के मेंथॉल असते चहा, सरबते, जेली, कँडी, सूप, आईस्क्रिममध्ये पानांचा सुगंध मिसळतात काही पेयांना सुगंध देण्यासाठी मिंट तेल वापरतात गांधील माशा, मुंग्या, झुरळांचा नाश करण्यासाठी पुदिनाचे तेल कीटकनाशकांत मिसळतात.

एक एकर पुदिन्याची शेती मी गतवर्षी केली होती. लॉकडाउनमुळे दर पडले. त्यावेळी हा पुदिना शेतात नष्ट केला. आता पाच गुंठ्यात मी पुदिना केला आहे. आता पेंडीला दर १० रुपये असून, उत्पादन खर्च पाहता १५ ते २० रुपये प्रति पेंडी दर मिळाला तरच पुदिन्याची शेती परवडते. दरवर्षी मी हा देशी वाणाचा पुदिना करत असतो.

- अजित भोसले, खुपिरे (ता. करवीर)

loading image
go to top