Tribal Voters at Risk: कागदपत्रांच्या अडचणींमुळे आदिवासी मतदार वंचित होण्याचा धोका; मनसे तालुकाध्यक्ष सुनील साठे यांची प्रशासनाकडे सहकार्याची मागणी

कागदपत्रांच्या जाचक अटींमुळे आदिवासी मतदार हक्कांपासून वंचित होण्याचा धोका; मनसे तालुकाध्यक्षांची प्रशासनाकडे तातडीच्या सहकार्याची मागणी
The party claimed that incomplete documentation could affect the inclusion of eligible voters in the electoral roll.

The party claimed that incomplete documentation could affect the inclusion of eligible voters in the electoral roll.

Sakal

Updated on

पाली : सुधागड तालुक्यातील दुर्गम भागात आणि वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या अनेक आदिवासी बांधवांना मतदार यादीशी संबंधित फॉर्म भरताना आवश्यक कागदपत्रे आणि दाखले मिळवण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अपुऱ्या कागदपत्रांमुळे त्यांचे फॉर्म बाद होऊन त्यांची नावे थेट मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) सुधागड तालुकाध्यक्ष सुनील साठे यांनी नुकतीच सुधागडचे नायब तहसीलदार (निवडणूक) नकुल पोळेकर यांची भेट घेऊन त्यांना या समस्येबाबत अवगत केले व आदिवासी बांधवांना सहकार्य करण्याची मागणी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com