माझा सिध्दांत पवार साहेबांसोबत; तटकरेंचे स्पष्टीकरण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत असताना पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी आपण कायम शरद पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्टीकरण दिले.

रायगड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत असताना पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी आपण कायम शरद पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्टीकरण दिले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत आणि सुनिल तटकरे यांची भेट झाल्यानंतर तटकरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते. चंद्रकांत पाटील यांच्यासोबतची भेट केवळ मतदार संघातील कामांसाठी झाली असल्याचे सांगतानाच तटकरे यांनी माझा विचार, माझा सिध्दांत पवार साहेबांच्या सोबत असल्याचे सांगितले आहे. कोणीही कसल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले असून पक्षातील अनेक नेते पक्ष सोडून भाजप शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आतापर्यंत अनेक विद्यमान आमदारांसह महत्वाच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunil Tatkare Clarify about Rumors of he enter in BJP