'शिवसेनेने प्रतिसाद दिल्यास एकत्र लढणार ; आघाडीसाठी आम्ही सकारात्मक आहोत"

sunil tatkare said in press conference run with shiv sena in ratnagiri
sunil tatkare said in press conference run with shiv sena in ratnagiri

रत्नागिरी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढण्याचा आमचा समान अजेंडा आहे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. शिवसेनेने प्रतिसाद देण्याची गरज आहे. तसे झाले तर आम्ही आघाडीसाठी सकारात्मक आहोत. त्या-त्या जिल्ह्यांतील राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेतले जातील, अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  

मोदी लाटेमुळे यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये पक्षाची प्रचंड पडझड झाली. मात्र, शरद पवार यांच्या करिष्म्याने सर्व यातून सावरले आहेत. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यात पक्ष वाढविण्यासाठी ताकद दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, नुकत्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीची बेरीज केली तर राज्यात आघाडीच नंबर एकवर आहे. सत्तेपासून दूर झालेल्यांना सत्य समजून घेता येत नाही. शिवसेनेने प्रतिसाद दिल्यास एकत्र लढणार अजूनही आपण सत्तेत आहोत, या आविर्भावात भाजप आहे. यापूर्वी युतीची सत्ता होती, तरी त्यांच्यातही कुरबुर होती.

अनेक वेळा युती असून महापालिकेच्या निवडणुका स्वतंत्र लढल्या आहेत. ते २५ वर्षे टिकले. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुरबुरी असल्या तरी ते भविष्यात अनेक वर्षे टिकणार आहे. भाजपच्या आरोपांचा कोणताही परिणाम त्यावर होणार नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आघाडी म्हणून लढण्याबाबत लवकरच सर्व पक्षांची बैठक घेऊन त्यामध्ये निर्णय घेतला जाईल. यापूर्वी मोदी लाट होती. स्वत:च्या सावलीला घाबरू लागल्याने अन्य पक्षात उड्या मारल्याने जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाले. मात्र, शरद पवारांचा झंझावात आला आणि वातावरण बदलले. सत्ता स्थापन करून अनेकांना पवारांनी चपराक दिली. जिल्ह्यातही चांगली परिस्थिती आहे.

शेतकरी आंदोलनाबाबत केंद्र गंभीर नाही

केंद्र सरकारने कृषी, कामगार क्षेत्राला देशोधडीला लावणारे कायदे केले आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा सलग दोन महिने लाखो शेतकरी आंदोलन करत आहेत. परंतु त्याची दखल केंद्र सरकारने घेतली नाही. प्रजासत्ताक दिनी आंदोलकांचा उद्रेक झाला. आंदोलकांनी उचलेले पाऊल योग्य नसले तरीही मूळ मुद्दा कायम आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांबद्दल गंभीर नाही, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. 

तटकरे म्हणाले

  • ग्रा.पं. निवडणुकीत राज्यात आघाडीच नंबर एकवर 
  • भाजप अजूनही सत्तेत असल्याच्या आविर्भावात 
  • यापूर्वी युतीची सत्ता होती, त्यांच्यातही कुरबुर होती
  • आगामी निवडणूक लढण्याबाबत लवकरच सर्व पक्षांची बैठक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com