
Mahayuti Government : महायुतीत प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यानुसार आम्ही अजित यशवंतराव यांना पक्षात घेतले. युतीतील अन्य पक्षांनीही याच पद्धतीने पक्षप्रवेश करून घेतले आहे. विधानसभा निवडणुकीत कडव्या शब्दांत खालच्या पातळीवर येऊन टीका करणाऱ्यांना पक्षात घेतले. त्यांना प्रवेश देताना आम्हाला विचारले का? असा प्रश्न उपस्थित करत, अजित यशंवतराव यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे उद्योगमंत्री उदय सामंत नाराज झाले असले तरी ते माझेच चेले आहेत. महायुतीच्या बैठकीत ते भेटतील त्यांची शंका दूर करेन, असे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.