esakal | पोलिसांवर बोलण्या इतकी कंगना राणावत कोण लागून गेली? आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही
sakal

बोलून बातमी शोधा

In support of Mumbai Police nilesh rane tweet attack for kangana ranaut tweet

सिने अभिनेत्री कंगना राणावत आणि मुंबई पोलिस यांच्यात वाद झाला होता.

पोलिसांवर बोलण्या इतकी कंगना राणावत कोण लागून गेली? आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही

sakal_logo
By
शिवप्रसाद देसाई

सिंधुदुर्ग : मुंबई पोलिसांवर बोलण्याइतकी राणावत कोण लागून गेली. आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा माजी खासदार नीलेश राणे यांनी ट्वीट करून दिला आहे.ट्वीटरवर बदनामीकारक मजकूराला लाईक करण्यावरून सिने अभिनेत्री कंगना राणावत आणि मुंबई पोलिस यांच्यात वाद झाला होता. यावरून राणावत यांनी मुंबई पोलिसांची भीती वाटते असे वक्तव्य केले होते.

आता मुंबई पोलिसांच्या समर्थनार्थ माजी खासदार राणे धावून आले आहेत. त्यांनी आज केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘2/3 अधिकारी प्रेशरमध्ये आले म्हणजे संपुर्ण पोलिस डिपार्टमेंट दोषी होत नाही. आम्हाला महाराष्ट्र पोलिसांवर अभिमान आहे. मुंबई पोलिसांवर बोलण्याइतकी राणावत कोण लागून गेली ?? एसएसआर आणि सालियान प्रकरणात खरे आरोपी पकडण्याच्या समर्थनात आम्ही आहोत; पण आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही.’या टिकेशी सुशांतसिंग रजपूत आत्महत्या प्रकरणाचाही संबंध जोडला जात आहे.

हेही वाचा- मुंबईसह कोकणात या दिवशी मुसळधार पाऊस

राणे सातत्याने या प्रकरणावरून शिवसेेनेवर टिका करत आले आहेत. आठ दिवसापुर्वी कंगना यांनी ट्वीट करत म्हटले होते की, ‘मी नार्कोटिक्स ब्युरोला मदत करण्यास तयार आहे; पण मला केंद्र सरकारकडून संरक्षण मिळावे. मी फक्त माझे करिअरच नाही तर माझा जीवही धोक्यात घातला आहे. सुशांतला काही रहस्य माहित होती, म्हणूनच तो मारला गेला. सुशांतच्या मारेकर्‍यांविरुद्ध लढा देणार्‍या लोकांची निंदा करणारे ट्विट लाइक केले जात आहेत. छेडछाड आणि दमदाटीचा निषेध करण्याऐवजी मुंबई पोलिस आयुक्त त्यांना प्रोत्साहन देत आहेत. लज्जास्पद!! असे ट्विट कंगनाने स्क्रीनशॉटसह केले होते.

संपादन - अर्चना बनगे