कमी वेळात, कमी खर्चात न्याय मिळण्यासाठी कोल्हापुरात खंडपीठ गरजेचे; न्यायाधीश भूषण गवई l Bhushan Gavai | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'कमी वेळात, कमी खर्चात न्याय मिळण्यासाठी कोल्हापुरात खंडपीठ गरजेचे'

'कमी वेळात, कमी खर्चात न्याय मिळण्यासाठी कोल्हापुरात खंडपीठ गरजेचे'

ओरोस : नागरीकांना कमी वेळात आणि कमी खर्चात न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी न्यायालयांचे विकेंद्रिकरण आवश्यकत आहे. औरंगाबाद खंडपीठासाठी (Aurangabad Bench)सुद्धा विरोध झाला होता. आता त्याचा फायदा अनेक जिल्ह्यातील पक्षकारांना होत आहे.  त्यामुळे कोल्हापूर खंडपीठाची (Kolhapur) येथील वकिलवर्ग व बार कौन्सिलची असलेली मागणी रास्त आहे. म्हणूनच कोल्हापूर खंडपीठासाठी माझा जाहीर पाठींबा आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती भूषण गवई (Supreme Court Justice Bhushan Gavai)यांनी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या कंट्युलिअर लीगल एज्युकेशन (क्लेप) कार्यक्रमात बोलताना केले.

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र -गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आज सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे कंट्यूनीयर लीगल एज्युकेशन प्रोग्राम (क्लेप)चे आयोजन करण्यात आले होते. बार कौन्सिलने जिल्हातील नवोदीत वकीलांसाठी मार्गदर्शन  तसेच कोल्हापूर खंडपीठाचे प्रयत्न या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

दोन सत्रात चालणार्‍या या कार्यक्रमात पहिल्या सत्रात उद्घाटन कार्यक्रम झाला. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक न्यायाधीश प्रकाश नाईक, सिंधुदुर्ग सुपुत्र तथा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे, सर्वोच्य न्यायालयाचे विशेष सरकारी वकील शेखर नाफडे, महाराष्ट्र शासनाचे विशेष सरकारी वकिल पद्मश्री अँड उज्वल निकम, इंडियन बार असोशिएशन सदस्य तथा जेष्ठ वकिल जयंत जायभावे, जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश एस व्ही हांडे. सर्वोच्य न्यायालयाचे वकिल अरविंद आवाड, महाराष्ट्र गोवा बार असोशिएशनचे उपाध्यक्ष अँड संग्राम देसाई, रत्नागीरी बार असो. अध्यक्ष अँड दिलीप धारीया, सिंधुदुर्ग जिल्हा बार असो. चे अध्यक्ष अँड राजेद्र रावराणे तसेच महाराष्ट्र गोवा बार असोसीएशनचे राज्य भरातील सर्व सदस्य, सिंधुदुर्ग रत्नागीरी गोवा व कोल्हापूर सांगली सातारा जिल्हयातील वकिलवर्ग, जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, वकील आदी उपस्थीत होते.

न्यायाधीश गवई यांनी 'बदलते कायदे, बदलत्या संदर्भानुसार कायद्यांचे बदलते अर्थ व संपुर्ण कायद्यांची माहीती जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी देशातील वकिल वर्गाची असल्याचे स्पष्ट केले. कायद्याने चालणारे राज्य म्हणून आपल्या देशात लोकशाहीचे राज्य आहे ;मात्र आस्तित्वात असलेल्या कायद्यांची माहीती जनतेला असत नाही. म्हणूनच आपल्या देशातील जनतेला नव नवीन कायदे, बदलणारे कायदे व बदलणार्‍या कायद्याचे अर्थ जनतेपर्यंत पोहोचायला हवे व त्याची जबाबदारी सर्व वकील वर्गाने घ्यायला हवी."

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अँड उमेश सावंत अँड विलास परब यांनी केले.  प्रास्ताविक अँड संग्राम देसाई यांनी केले. आभार अँड राजेद्र रावराणे यांनी मानले. कोल्हापूर खंड पिठाच्या अनेक वर्षाच्या मागणी बाबत व बार कौन्सिलच्या पाठपुराव्याबाबत अँड देसाई यांनी प्रास्ताविकात मान्यवरांचे लक्ष वेधले. वकिल वर्गाच्या मार्गदर्शनासाठी या ठिकाणी आयोजीत केलेल्या या सोहळ्याचे व मार्गदर्शन चर्चा सत्राच्या कार्यक्रमाबाबत अनेक मान्यवर न्यायमूर्तीनी अँड देसाई यांचे कौतूक केले.

हेही वाचा: Kolhapur: बाळाच हृदय तंदुरुस्त झालं, घर आनंदान डोलू लागलं

दुपार नंतरच्या सत्रात प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ व पद्मश्री अँड उज्ज्वल निकम यांनी नवोदित वकिलांसाठी मार्गदर्शन केले. २६/११ चा खटला  तसेच अनेक खटल्यांबाबत  त्यांनी आपले अनुभव व मार्गदर्शक  या चर्चासत्रात मांडले. उच्च न्यायालयाच्या दुसरे  कायदेतज्ज्ञ अँड शेखर नाफडे यांनी कायद्यातील तरतुदी बाबतचे मार्गदर्शन केले. तिसरे मार्गदर्शक उच्च न्यायालयाचे अँड  अरविंद आवाड यांचे "अँडव्होकेट आँन रेकाॅर्ड" या विषयावर झाले. यावेळी नवोदीत वकील आणि जिल्हा पातळीवर काम करणार्‍या वकील वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नामांकित वकिलांचा सत्कार

 या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यातील ६ ज्येष्ठ   नामांकित वकीलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये नांदोस हत्याकांडात आरोपीना शिक्षा मिळवून देणारे कुडाळचे अँड श्रीकृष्ण उर्फ अजित नारायण भणगे, अँड अजित पांडुरंग गोगटे, अँड प्रकाश देवराव परब, पहिले सरकारी वकिल अँड विलास राधाकृष्ण पांगम, अँड सुभाष गोपाळ पणदूरकर व अँड प्रकाश शंकर रानडे या सिंधुदुर्गातील सहा जेष्ठ वकिलांचा समावेश होता. त्यांचा सतंजार मान्यवरांच्या उपस्थीतीत संपन्न झाला. अन या सोहळ्याला एका न्यायदानाच्या गौरवाची पोहोच दिली गेली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top