सिंधुदुर्ग अथवा रत्नागिरीत नीट परीक्षा केंद्र सुरू करावे ः  सुरेश प्रभू

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 August 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यामध्ये प्रवेश करणाऱ्या लोकांना सक्‍तीचे अलग ठेवणे आणि चाचण्या पार पाडण्याव्यतिरिक्‍त परराज्यातील गरीब व पात्र विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या राज्यात जाण्यासाठी भरपूर पैसे खर्च करण्यास मोठी अडचण होते.

कणकवली ( सिंधुदुर्ग ) - सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हे अखिल भारतीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेसाठी केंद्रापासून वंचित राहिले असल्याने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील विद्यार्थ्यांना नीट परीक्षेत भाग घेण्यासाठी जवळचे केंद्र असलेल्या गोव्याची निवड करावी लागते.

या पार्श्‍वभूमीवर सध्याची परिस्थिती पाहता सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरी येथे नीट परीक्षा केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल यांच्याकडे केली आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यामध्ये प्रवेश करणाऱ्या लोकांना सक्‍तीचे अलग ठेवणे आणि चाचण्या पार पाडण्याव्यतिरिक्‍त परराज्यातील गरीब व पात्र विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या राज्यात जाण्यासाठी भरपूर पैसे खर्च करण्यास मोठी अडचण होते. याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांच्या मनोवृत्तीवर होतो. यासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर व्हावी व त्यांच्या मूळ जागेपासून नीट परीक्षेत भाग घेण्याची समान संधी मिळावी म्हणून सिंधुदुर्गमध्ये नीट केंद्राची घोषणा करण्याचा विचार करावा, असेही त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suresh Prabhu Demand NIIT Center In Sindhudurg Ratnagiri