esakal | Sakal Impact : कोकणसंदर्भात सुरेश प्रभूंनी मुख्यमंत्र्यांना केले हे व्टीट....

बोलून बातमी शोधा

suresh prabhu on twitter the problem of selling cashew bondu should be solved kokan marathi news

माजी केंद्रीयमंत्री तथा खासदार सुरेश प्रभू यांनी व्टीटरव्दारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना हा प्रश्‍न तातडीने सोडवण्याची विनंती केली आहे. 

Sakal Impact : कोकणसंदर्भात सुरेश प्रभूंनी मुख्यमंत्र्यांना केले हे व्टीट....
sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

सावंतवाडी  (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्गात संचारबंदीमुळे शेकडो टन काजू बोंडू वाया जात आहेत. हा प्रश्‍न सोडवण्यासाठी माजी केंद्रीयमंत्री तथा खासदार सुरेश प्रभू यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबतचे वृत्त आज सकाळने प्रसिध्द केल्यानंतर त्याची दखल घेत त्यांनी व्टीटरव्दारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना हा प्रश्‍न तातडीने सोडवण्याची विनंती केली आहे. 

श्री. प्रभू यांनी दिर्घकाळ सिंधुदुर्गाचे लोकसभेमध्ये प्रतिनिधीत्व केले. कोकणच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक निर्णय घेतले. सध्या ते भारत सरकारच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदांसाठी मुख्य प्रतिनिधी अर्थात शेर्पा म्हणून कार्यरत आहेत. कोरोनामुळे देशभर जारी झालेल्या संचारबंदीमुळे सध्या कोकणातील आंबा, काजू आदी पिके अडचणीत आली आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी श्री. प्रभु येथील शेतकर्‍यांच्या मदतीला धावून आले आहेत. त्यांनी कोकणातील आंबा वाहतुकीचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी गेल्या आठवड्याभरात भरीव प्रयत्न केले. या विषयाशी संबंधीत उच्च स्तरीय अधिकारी, संस्था, मंत्री आदींशी समन्वय साधत हा प्रश्‍न बर्‍यापैकी मार्गी लावला. 

हेही वाचा- गंभीर बाब...काजू उत्पादकांवर मोठ संकट

काजू बोंडू विक्रीचा प्रश्‍न गंभीर
आंब्याबरोबरच कोकणातील काजू बोंडू विक्रीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. रोज शेकडो टन काजूबोंडू विक्री व्यवस्थेअभावी वाया जात आहेत. यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. प्रक्रिया उद्योगासाठी याची वाहतूक गोवा हद्दीतील उद्योगांपर्यंत करावी लागते; मात्र सध्या सिंधुदुर्ग-गोवा दरम्यानच्या सिमा बंद आहेत. या प्रश्‍नाबाबत सकाळने आज सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आवृत्तीच्या पान एकवर वृत्त प्रसिध्द केले होते. यात माजी पंचायत समिती सदस्य गणेशप्रसाद गवस यांनी याची दखल केंद्रस्तरावरून श्री. प्रभू यांनी घ्यावी अशी विनंती केली होती. 

हेही वाचा-सावधान...क्वारंटाईन आहात? मग तुम्ही हे वाचाच...

काजू बोंडू विक्रीचा प्रश्‍न सोडवावा : सुरेश प्रभू 

या वृत्ताची तातडीने दखल घेत श्री. प्रभू यांनी व्टीटरव्दारे मुख्यमंत्री ठाकरे यांना हा प्रश्‍न सोडवण्याची विनंती केली आहे. त्यांनी यात म्हटले आहे की, कोकणात शेकडो टन काजू बोंडू वाया जात आहे. काजू पिकाला वाहतूक, विपनन, विक्री व्यवस्थेसाठी मदतीची गरज आहे. महाराष्ट्र सरकारने यात तातडीने लक्ष घालावा अशी विनंती त्यांनी केली आहे. 

काजू बागायतदारांना दिलासा 
“सिंधुदुर्गातील शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांची माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांनी तातडीने दखल घेतल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. महाराष्ट्र आणि गोवा सरकारमध्ये समन्वय साधून आपण हा प्रश्‍न तातडीने सुटण्यासाठी करत असलेले प्रयत्न येथील काजू बागायतदारांना नक्कीच दिलासाजनक आहेत.”
- गणेशप्रसाद गवस, माजी पंचायत समिती सदस्य