Suvarnadurg Fort : सुवर्णदुर्ग किल्ल्यावर शासकीय पद्धतीने पहिल्यांदाच ध्वजारोहण; शासनाच्या निर्णयाचे कौतुक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० वर्ष पूर्ण झालेल्या आरमारातील किल्ला म्हणजे हर्णे येथील सुवर्णदुर्ग किल्ला. आजही महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे. शेकडो वर्षांनंतरही तटबंदी अभेद्य आहे.
Suvarnadurg Fort's first-ever official flag hoisting ceremony, a landmark moment for heritage recognition in Maharashtra.Sakal
दापोली: जागतिक वारसा यादीत नोंद होत असलेल्या दापोली तालुक्यातील हर्णे येथील सुवर्णदुर्ग किल्ल्यावर शासकीय पद्धतीने पहिल्यांदाच २६ जानेवारी ध्वजारोहण करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे कौतुकच होत आहे.