
डिमेंशिया हा मेंदूशी संबंधित एक गुंतागुंतीचा आजार आहे, जो स्मरणशक्ती, विचारशक्ती, आकलन क्षमता आणि दैनंदिन जीवनातील कार्यक्षमता यावर गंभीर परिणाम करतो. हा कोणताही विशिष्ट रोग नसून, अनेक प्रकारच्या मेंदूविकारांचा समूह आहे. अल्झायमर हा सर्वात सामान्य प्रकारचा डिमेंशिया आहे. डिमेंशियाचा प्रभाव केवळ रुग्णावरच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांवर आणि समाजावरही मोठ्या प्रमाणात होतो. हळूहळू स्मरणशक्ती कमी होणे, भ्रम निर्माण होणे, निर्णयक्षमतेत घट होणे आणि दैनंदिन कामे करण्यास अडचण येणे ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत.
- डॉ. कृष्णा पेवेकर, रत्नागिरी