भारत-पाक युद्धात महापराक्रम गाजवलेला 'रणगाडा' आज कुडाळात; 1971 च्या थरारक आठवणींना मिळणार उजाळा

भारतीय थलसेनेकडून (आर्मी) बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचा प्रस्ताव मंजूर झाला.
India-Pakistan War B. Nath Pai Central School
India-Pakistan War B. Nath Pai Central Schoolesakal
Summary

हा रणगाडा १९७१ च्या भारत-पाक युद्धात महापराक्रम गाजवलेल्या रणगाड्यापैकी एक रणगाडा आहे.

कुडाळ : भारत-पाक १९७१ युद्धामध्ये (India-Pakistan War) महापराक्रम गाजवलेल्या टी-५५ या रणगाड्याचे येथील सीबीएसई बोर्डाच्या बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये (B. Nath Pai Central School) आज (ता. २०) आगमन होणार आहे. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांना भारतीय सेनेने (Indian Army) गाजवलेल्या महापराक्रमाची माहिती व्हावी, त्यांना भारतीय सैन्याच्या शस्त्र सामुग्रीचे ज्ञान मिळावे म्हणून भारतीय थल सेनेकडे रणगाड्याची (Tank-T-५५) मागणी केली होती.

भारतीय थलसेनेकडून (आर्मी) बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचा प्रस्ताव मंजूर झाला. हा रणगाडा १९७१ च्या भारत-पाक युद्धात महापराक्रम गाजवलेल्या रणगाड्यापैकी एक रणगाडा आहे. आज आर्मी विभागाच्या खडकी-पुणे येथून तो दुपारी ३ वाजता निघून उद्या सकाळी ७ वाजता फोंडा (ता. कणकवली) येथे व तेथून कणकवली, कसाल, ओरोस, हुमरमळा, कुडाळ येथे पोहोचेल.

India-Pakistan War B. Nath Pai Central School
ACB Inquiry : माझ्याकडे साडेतीन कोटींची अपसंपदा कुठून आली, हे मलाच माहिती नाही; आमदार साळवींचं स्पष्टीकरण

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एनसीसीच्या विद्यार्थ्यांकडून रणगाड्याचे स्वागत करण्यात येईल. त्यानंतर बाजारपेठमार्गे एमआयडीसीमधील बॅ. नाथ पै सेन्ट्रल स्कूल (सी.बी.एस.ई) येथे उतरविण्यात येईल, अशी माहिती बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी दिली.

India-Pakistan War B. Nath Pai Central School
शिवाजी विद्यापीठात 57 वर्षांपूर्वीच वाल्मिकी ऋषींच्या 'रामायणा'वर झाले संशोधन; कथेची वेगळ्या भूमिकेतून केली पाहणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com