esakal | शिक्षक दिन विशेष: 13 शाळा असलेल्या `या` केंद्राचे काम पेपरलेस 
sakal

बोलून बातमी शोधा

Teacher Day Special Paperless Work In 13 School In Sakharpa Center

साखरपा नं. 1 हे केंद्र तालुक्‍यातील पेपरलेस केंद्र करण्यात त्यांचा वाटा मोठा आहे. केंद्रातील विद्यार्थी उपस्थिती हा चिंतेचा विषय ठरत असताना साळुंखे यांनी त्यावर कल्पकतेने उपाय शोधला. ते स्वत: योग अभ्यासक आहेत.

शिक्षक दिन विशेष: 13 शाळा असलेल्या `या` केंद्राचे काम पेपरलेस 

sakal_logo
By
अमित पंडित

साखरपा ( रत्नागिरी) - संगमेश्‍वर तालुक्‍यातील साखरपा क्र. 1 हे केंद्र तंत्रस्नेही बनले आहे. 2018-19 या शैक्षणिक वर्षात हे केंद्र पेपरलेस करण्यात आले. केंद्रात 13 शाळा आहेत, पण कोणताही अहवाल असो, माहिती असो तिचे आदानप्रदान कागदावरून होत नाही. कागद मागवले जात नाहीत. केंद्रशाळेत एकही कागद घेऊन शिक्षक येत नाहीत. सगळी माहिती ई-मेल नाहीतर व्हॉट्‌सऍपवर जमवली जाते. 

13 शाळा त्यातील काही दुर्गम भागात असूनही हे शक्‍य झाले उपक्रमशील वृत्तीमुळे. विद्यार्थी उपस्थिती या सध्या सर्व शाळांमध्ये चिंतेचा विषय असताना त्यावरही या केंद्रात कल्पकतेने उपाय शोधण्यात आला. केंद्रप्रमुख हा केंद्राचा कर्णधार असतो. त्याच्या मार्गदर्शनाखाली केंद्राची प्रगती ठरते. उपक्रमशीलतेने आदर्श केंद्रप्रमुख हा पुरस्कार मिळवणारे साखरपा नं. 1 चे केंद्रप्रमुख कृष्णनाथ साळुंखे यांना याचे श्रेय जाते. 

साखरपा नं. 1 हे केंद्र तालुक्‍यातील पेपरलेस केंद्र करण्यात त्यांचा वाटा मोठा आहे. केंद्रातील विद्यार्थी उपस्थिती हा चिंतेचा विषय ठरत असताना साळुंखे यांनी त्यावर कल्पकतेने उपाय शोधला. ते स्वत: योग अभ्यासक आहेत. सिद्ध समाधी योगा हा सहा महिन्यांचा कोर्स त्यांनी पूर्ण केला आणि ते स्वत: केंद्रातील मार्गदर्शक झाले.

दोन वर्षांपूर्वी त्यांनी शिक्षकांसाठी तीन महिन्यांचे योग शिक्षण शिबिर घेतले. या शिबिरातून तयार झालेल्या शिक्षकांनी आपापल्या शाळेत विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले. त्याचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांची क्षमता वाढली आणि उपस्थिती वाढण्यात त्याचा हातभार लागला. साळुंखे यांना 2019-20 वर्षातील आदर्श केंद्रप्रमुख हा पुरस्कार ही अशा कामाची पावती आहे. 

शिक्षकांचे प्रयोग शब्दबद्ध 
मागील दोन वर्षे केंद्रातील शिक्षकांचे हस्तलिखित प्रकाशित होते. 2018-19 यावर्षी "अभिमान गाथा' या नावाने हस्तलिखित तयार होत आहे. मागील वर्षी "अनुभवामृत' या नावाने ते तयार झाले. यात शिक्षक त्यांचे प्रयोग शब्दबद्ध करतात. मागील वर्षाच्या हस्तलिखिताची दखल डाएटकडून घेण्यात आली. डाएटच्या "घे भरारी' या नियतकालिकात हस्तलिखितावर लेख लिहिण्यात आला. 
 

loading image