esakal | संवर्ग एकमधील शिक्षकांची कार्यमुक्तीसाठी धडपड 
sakal

बोलून बातमी शोधा

teacher demand of Discharge

रिक्त पदांचा टक्का वाढण्याची भिती असल्यामुळे जिल्हा परिषदेकडून सावध पवित्रा घेतला जात आहे.

संवर्ग एकमधील शिक्षकांची कार्यमुक्तीसाठी धडपड 

sakal_logo
By
पाजेश कळंबटे

रत्नागिरी - जिल्हा परिषद आंतरजिल्हा बदली प्राप्त प्राथमिक शिक्षकांपैकी संवर्ग 1 मधील शिक्षकांना कार्यमुक्त करावे अशी विनंती अध्यक्ष रोहन बने यांच्याकडे करण्यात आली आहे. आंतजिल्हा बदलीप्राप्त शिक्षक सोडण्यात आल्यास रिक्त पदांचा टक्का वाढण्याची भिती असल्यामुळे जिल्हा परिषदेकडून सावध पवित्रा घेतला जात आहे.


प्राथमिक शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे राबविण्यात आली आहे. बदलीप्राप्त शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी असे ग्रामविकास विभागाकडून कळविण्यात आले आहे. परंतू, अद्यापही संबंधित शिक्षकांना कार्यमुक्त केलेले नाही. संगणकीय प्रणाली माध्यमातून बदली झालेल्या शिक्षकांपैकी रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांनी विशेष संवर्ग भाग 1 आणि विशेष संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांना कार्यमुक्त करावयाचे आहे. त्यांना कार्यमुक्त न केल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना जबाबदार धरले जाईल असे आदेशात नमुद केले आहे.
 

रत्नागिरी जिल्ह्यातून मराठी माध्यमातील शिक्षकांच्या 324 बदल्या केल्या आहेत. त्यात संवर्ग 1 मधील दुर्बल घटकातील 17 शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. शासन निर्णयानुसार संवर्ग 1 मधील शिक्षकांना प्राधान्याने प्रथमतः कार्यमुक्त करावे असे आदेशात आहे. रत्नागिरी जिल्ह्याची रिक्त पदाची टक्केवारी 9.57 टक्के आहे. त्यामुळे सर्व 324 शिक्षकांना कार्यमुक्त करता येणार नाही; परंतु, शासन निर्णयानुसार संवर्ग 1 मधील 17 शिक्षकांना नियमानुसार कार्यमुक्त करता येईल. त्यासाठी शिक्षक भरती होण्याची वाट बघण्याची गरज नाही. संवर्ग 1 मधील 17 शिक्षकांना कार्यमुक्त केल्यानंतर रिक्त पदांच्या टक्केवारी 10 पेक्षा जास्त जाणार नाही. त्यामुळे संवर्ग 1 मधील दुर्बल घटकातील शिक्षकांना कोरोना सारख्या आजारात स्वगृही आपल्या आई-वडिलांजवळ जाण्यासाठी आपण सहानुभूतीपूर्वक निर्णय घेऊन न्याय देऊन तात्काळ कार्यमुक्त करावे अशी विनंती बदलीप्राप्त शिक्षकांनी निवेदनाद्वारे अध्यक्षांकडे केली आहे.

हे पण वाचा - कोविड योद्ध्यांनी उचलली ढाल अन् तयारीस झाले सज्ज


ज्या शिक्षकांची दुसर्‍या जिल्ह्यात विनंतीने बदली झाली आहे, त्या शिक्षकांचे विनंती अर्ज संबंधित जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावेत. अर्ज प्रसिध्दीनंतर ज्या शिक्षकांनी माहिती चुकीची अथवा खोटी भरलेली आहे. अशी तक्रार आल्यास त्या तक्रारीबाबत जिल्हास्तरावरुन चौकशी करण्यात यावी व चौकशीत तथ्य आढळल्यास बदली रद्द केली जाईल. तसेच त्यांच्याविरुध्द कडक कारवाई करावी.

हे पण वाचा - मानलं या गावाला... तब्बल चाळीस वर्षांपासून इथे एकही दारूचा थेंब मिळत नाही

 आंतरजिल्हा बदलीसंदर्भात शिक्षण सभापतींबरोबर दोन दिवसात चर्चा होणार आहे. जिल्ह्यातील रिक्त पदांचा विचार करुनच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

- रोहन बने, अध्यक्ष, जिल्हा परिषद

संपादन - धनाजी सुर्वे 

loading image