कोविड योद्ध्यांनी उचलली ढाल अन् तयारीस झाले सज्ज

विजय लोहार
Wednesday, 2 September 2020

कोरोना वर मात करून पुन्हा हे सर्वजण आपल्या कर्तव्यासाठी तयार झाले आहेत

नेर्ले (सांगली) : कोरोना झालेले कासेगाव पोलीस ठाण्याचे योद्धे पोलिस पुन्हा कोरोनाशी लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. मार्च महिन्यापासून आज अखेरपर्यंत अक्षरशः मृत्यूच्या दाढेत कोविड १९चे कासेगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी काम करत आहेत.मागील तीन आठवड्यापूर्वी सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांचेसह  सहा पोलीसाना  कोरोना ने गाठले.संकट उभे राहीले.परंतु कोरोना वर मात करून पुन्हा हे सर्वजण आपल्या कर्तव्यासाठी तयार झाले आहेत याबद्दल या कोरोना योध्याचा फुले व औक्षण  करण्यात आले.

हेही वाचा- सांगलीत आयसोलेशन करण्यात आलेल्या लक्षणे नसलेल्या रुग्णांवर उपचार होणार जलद

राष्ट्रीय महामार्गावरील सांगली जिल्ह्याचे मुख्य प्रवेशद्वारावरील कोरोना रोखणारे योद्धे असणारे ठिकाण म्हणजे कासेगाव पोलीस ठाणे.मार्च महिन्यापासून आज अखेरपर्यंत अक्षरशः मृत्यूच्या दाढेत कोविड १९चे कासेगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत.महामार्गावरील मालखेड फाट्यावर गस्त घालणारे कासेगाव पोलीस कर्मचारी यांनी उत्तर भारतातून येणाऱ्या हजारो वाहनांची लोकांची तपासणी करत आहेत.पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १० गावांच्या भागातील कोरोना पॉजिटिव्ह गावात गस्त घालणे.विविध गुन्हे दाखल करणे.मीटिंग घेऊन सूचना देने हे सातत्याने सुरू असते.त्यामुळे गेली दोन आठवडे मोकळे झालेले कासेगाव पोलीस ठाणे आता नव्या दमाने कोरोनाशी लढन्यासाठी तयार झाले  आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police department fighter story in sangli