शिक्षकांच्या सहभागाने कोकणात ऑफलाइन शिक्षण पद्धतीही रुजतीये

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

सुमारे दोन तासांमध्ये पंधरा मिनिटांचा एक उत्कृष्ट व्हिडिओ तयार होतो.

राजापूर : पाठ्यपुस्तकीय अभ्यासक्रमाची माहिती गुगलवरून डाऊनलोड केल्यानंतर ‘काईन मास्टर ॲप’च्या साहाय्याने त्याचे व्हिडिओमध्ये रूपांतर केले. व्हिडिओमध्ये नावीन्य येण्यासाठी ॲपमधील विविध प्रकारच्या फिचरचा खुबीने उपयोग केला. सुमारे दोन तासांमध्ये पंधरा मिनिटांचा एक उत्कृष्ट व्हिडिओ तयार होतो, अशी माहिती भालावली शाळा नं. ४ चे प्रयोगशील आणि तंत्रस्नेही शिक्षक ज्योतिर्लिंग कोळी यांनी दिली.

हेही वाचा - अंत्यविधीकडे ठेकेदाराची पाठ : दहा मृतदेह अंत्यविधीच्या प्रतीक्षेत , शेवटी नातेवाईकांनीच नेले शवागरातून मृतदेह 

 

ते म्हणाले, यापूर्वी मित्राकडे व्हिडिओ एडिटिंगच्या केलेल्या कामासह शालेय अभ्यासक्रमाचे राज्य व्हिडिओ निर्माते भूषण कुळकर्णी यांच्या कार्यशाळेतील सहभागाचा उपयोग झाला. त्यांच्यासह तालुक्‍यातील ३५ शिक्षकांनी समरसतेने तयार केलेल्या विविध व्हिडिओंमुळे तालुक्‍यातील विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिक्षण घेणे सोयीचे झाले. ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहाव्या लागणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिक्षण देणे शक्‍य आहे का? याची चाचपणी करताना व्हिडिओ बनविण्याची संकल्पना पुढे आली. कोळी इंग्रजी विषयावर व्हिडिओ बनवित आहेत. 

कुळकर्णी यांच्या कार्यशाळेतील सहभागानंतर आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ निर्मितीचा त्यांनी संकल्प केला. दोन वर्षांपूर्वी सुरवातीला लॅपटॉपवर ‘कॅम्पा साया’ या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने व्हिडिओ बनविले. त्याला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पॉवर पॉइंटचाही खुबीने उपयोग करीत व्हिडिओ बनविता येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सागर पाटील आणि अशोक सोळंके, विनोद सावंत आदींच्या मार्गदर्शनाखाली आपण पाठ्यपुस्तकीय अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ बनवित आहोत. इतर शिक्षकांसह विषयतज्ञांचे सहकार्य लाभते. 

हेही वाचा -  अवघ्या १२ तासांत पोलिसानी लावला छडा :  झोपेतच आवळला कारमध्येच गळा

 

‘दख्खनचा राजा’ 

आधुनिक ज्ञानपद्धतीचा उपयोग करीत तंत्रस्नेही शिक्षक ज्योतिर्लिंग कोळी गेल्या सुमारे दोन वर्षापासून व्हिडिओ बनवित आहेत. हे व्हिडिओ त्यांनी ‘दख्खनचा राजा’ या नावाने यू ट्यूब चॅनेलवर डाऊनलोड केले. सद्यःस्थितीमध्ये त्याचे ‘सुजय कोळी’ हे नामांतर केल्याचे त्यांनी सांगितले.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: teacher learn to students offline education with the help of video editing and youtube channel in ratnagiri