

CTET Exam
sakal
पाली - केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) देणाऱ्या रायगड जिल्ह्यातील शिक्षकांसाठी यंदाची परीक्षा म्हणजे केवळ ज्ञानाची नाही, तर एक मोठी 'सत्वपरीक्षा' ठरत आहे. एकीकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे कर्तव्य दुसरीकडे भविष्याची चिंता आणि शेकडो किलोमीटर लांब आलेली परीक्षा केंद्रे, यामुळे शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.