लग्नाचे आमिष दाखवून आदिवासी अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अमित गवळे
मंगळवार, 23 एप्रिल 2019

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील घोडपापड आदिवासीवाडीतील एका अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या गुन्ह्यातील चार पैकी दोघांना पाली पोलीसांनी अटक केली असून दोघे अद्याप फरार आहेत. सबंधितांवर बलात्कार, पास्को व ऍट्रोसिटी आदी गुन्हे दाखल केले आहेत. गुन्ह्यासाठी वापरलेली कार देखिल पोलीसांनी ताब्यात घेतली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की राजेश एकनाथ वाघमारे रा. कुंभवली, ता. खालापूर या विवाहीत तरुणाने सबंधीत पिडीत मुलीसोबत ओळख करुन तीला लग्नाचे आमिष दाखविले. राजेशने या मुलीला आपले लग्न झाले असल्याचे लपवून ठेवले होते. राजेश व त्याच्या साथीदार नुकतेच घोडपापड येथून त्या मुलीला रेनॉल्ट डस्टर कार क्र. एम.एच. 46 झेड -5603 घेवून जाण्यासाठी आले. राजेश सोबत त्याचा साथीदार व कारचा मालक राजेश रमेश घरत रा. नवीन पनवेल आणि अन्य दोन साथीदार देखील होते.

राजेश वाघमारे हा राजेश घरत याच्याकडे डंपरवर कामाला होता. राजेशने पिडीत मुलीला पनवेल विचुंबे (शिवकर) येथे नेले व एका रुममध्ये ठेवून तिच्यावर बलात्कार केला. शुक्रवारी  (ता.19) पिडीत मुलीने रुममध्ये कोणी नसताना शेजारील महिलेचा मोबाईल घेवून आपल्या घरी फोन केला व त्यांना नेण्यास बोलाविले. त्यानंतर शनिवार  (ता.20) या संदर्भात पाली पोलीस स्थानकांत तक्रार दाखल करण्यात आली. सदर तक्रारीनुसार पोलीसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील आरोपींवर भा.द.वी कलम 376, 363(34), बाललैगिक अत्याचार(पास्को) 3,4,5,6, सुधारीत ऍट्रोसिटी कायदा कलम 3 (1) डब्लू (1) (2) नुसार पाली पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपअधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक रविंद्र शिंदे हे करीत आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: teenage girl raped at Pali Raigad